आवाडे बँकेच्या व्यवस्थापकिय मंडळाच्या अध्यक्षपदी चौगुले

आवाडे बँकेच्या व्यवस्थापकिय मंडळाच्या अध्यक्षपदी चौगुले

83492
आवाडे बँकेच्या व्यवस्थापकीय
मंडळाच्या अध्यक्षपदी चौगुले
इचलकरंजी, ता. १७ः येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या अध्यक्षदी सीए चंद्रकांत चौगुले यांची, तर तज्ज्ञ संचालकपदी सीए मनोहर जोशी व अॅड. सारंग जोशी यांची निवड केली. अध्यक्ष स्वप्नील आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नियुक्त्या केल्या.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संचालक मंडळामध्ये बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या दोन तज्ज्ञांची संचालक म्हणून नेमणूक करणे बंधनकारक आहे. त्यानुसार वरील दोघांची निवड केली. सहा सदस्यांचे व्यवस्थापकीय संचालक मंडळ गठित केले. त्यापैकी तीन सदस्य बँकेच्या संचालक मंडळातून नियुक्त केले. त्यानुसार अध्यक्षपदी चौगुले, उपाध्यक्ष सीए संजय अनिगोळ, श्रीशैल कित्तूरे यांच्यासह राजू चव्हाण, योगेश पाटील व सचिन देवरुखकर यांची नियुक्ती केली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, सरव्यवस्थापक किरण पाटील, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com