दारू कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू कारवाई
दारू कारवाई

दारू कारवाई

sakal_logo
By

83311

१४ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त
‘उत्पादन शुल्क’ची व्हन्नूर फाट्यावर कारवाई; टेम्पो चालकास अटक

कोल्हापूर, ता. १६ ः सोलर स्पेअर पार्टच्या नावाखाली गोवा बनावट विदेशी दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज चालकासही अटक केली. नेताजी एकनाथ भोसले (वय २६, रा. अंतराळ, भोसले वस्ती ता. जत जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. कारवाईत सुमारे १४ लाख २० हजार ८०० रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि टेम्पो असा एकूण सुमारे २२ लाख २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला असून, इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की कागल सीमा नाका व हातकणंगले विभागाने कागल-निढोरी मार्गावर व्हन्नूर फाटा येथे सापळा रचला होता. येथे संशयित टेम्पो थांबविल्यानंतर माल काय आहे याची विचारणा चालकाकडे केल्यावर त्याने सोलरचे स्पेअर पार्ट असल्याचे सांगितले. त्याबाबतचे बिल व इतर कागदपत्रेही दाखवली. मात्र, पथकातील अधिकाऱ्यांनी टेम्पोच्या पाठीमागील शटरचे सील कट करून तपासणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता प्रतिबंधित व गोवा राज्यात विक्रीसाठी असणाऱ्या अॅड्रीयल क्लासिक व्हिस्कीचे ७५० मिलीचे एकूण २०० बॉक्स व इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीचे १८० मिलीचे 10 बॉक्स असे गोवा बनावट विदेशी दारूचे एकूण २१० बॉक्स मिळाले.
राज्य उत्पादन शुल्क, उपअधीक्षक राजाराम खोत, सीमा तपासणी नाका कागलचे निरीक्षक जगन्नाथ पाटील, हातकणंगले विभागाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक कृष्णात शेलार, जानी मुल्ला, मुकेश लाडके, जवान सर्वश्री सुभाष कोले, धीरज पांढरे, सचिन लोंढे, सागर शिंदे, मुकेश माळगे, संजय जाधव, साजिद मुल्ला यांनी कारवाईत सहभाग घेतला.