Gag171_txt.txt

Gag171_txt.txt

83325
गगनबावड्यात जखमी जनावरांची भटकंती
गगनबावडा : गगनबावड्यात अनेक जनावरे मोकाट फिरत आहेत. त्यातील काही गाईंना पाठीवर जखमा झालेल्या आहेत. लम्पीसदृश दुर्धर आजाराने त्या ग्रस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फिरणाऱ्या जनावरांच्या मालकांनी व पशुसंवर्धन प्रशासनाने माहिती घेऊन त्यांच्यावर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. याबाबत सांगशी -सैतवडेचे सरपंच भास्कर माने म्हणाले, जखमी अवस्थेत आठ ते दहा गाई फिरत आहेत. अशी जनावरे फिरत राहिल्यास अनेक पशुधनांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने दखल घेऊन योग्य कारवाई करावी.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com