
ऋणमुक्तेश्वर तालीम सुशोभीकरण
83345
शाहू उद्यान विकासासाठी एक कोटी निधी देणार ः क्षीरसागर
कोल्हापूर, ता. १७ ः राजर्षी शाहू उद्यानातील विविध विकासकामांसाठी एक कोटींचा निधी देणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जाहीर केले. गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिर व तालीम संस्थेच्या नूतनीकरणाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
श्री. क्षीरसागर यांच्या विशेष निधीतून तालमीच्या इमारतीसाठी पंधरा लाखांचा निधी दिला होता. त्यातून मंदिराच्या प्रशस्त हॉलमध्ये बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि माहितीपटाची सुविधा केली आहे.
यावेळी ऋतुराज क्षीरसागर, मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर वास्कर, उपाध्यक्ष पवन माजगावकर, उत्सव कमिटी अध्यक्ष सोमेश पाडळकर, उपाध्यक्ष विशाल वास्कर, आशिष पाडळकर, ओंकार पुरेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विश्वनाथ सांगावकर, अरुण निगवेकर, नितीन ब्रह्मपुरे, दीपक येसार्डेकर, विराज पाटील, अमृत पाटील, अमित कदम आदी उपस्थित होते.