Tue, March 28, 2023

पश्चिम विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ ‘द्वीतीय’
पश्चिम विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ ‘द्वीतीय’
Published on : 19 February 2023, 11:25 am
83494
पश्चिम विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत विद्यापीठ द्वितीय
कोल्हापूर ः भोपाळ (मध्य प्रदेश) येथे आयोजित पश्चिम विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघाने २२.५ (साडेबावीस) गुणांनी द्वितीय क्रमांक मिळविला. संघामध्ये तृप्ती प्रभू, मयुरी सावळकर, गायत्री राजपूत, ईशा कोळी, अनुष्का पाटील, वैष्णवी पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. प्रभू हिने पाचव्या बोर्डसाठी सुवर्णपदक मिळविले. विजय संघाची ऑल इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघाला प्रशिक्षक डॉ. सविता भोसले, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांचे मार्गदर्शन मिळाले.