निवडुंगांचं जग. निवडुंगाचा उद्योग

निवडुंगांचं जग. निवडुंगाचा उद्योग

बिग स्टोरी
- अमोल सावंत

83491, 83486

निवडुंग, सक्युलंटस्‌चे अनोखे जग

लीड
निवडुंग (कॅक्टस) वनस्पतीबद्दल अनेक गैरसमज आहेत. निवडुंग नकारात्मकता पसरवितात, निवडुंगाची कुंडी घरात असू नये. मात्र, कोणत्याही वनस्पतीला विनाकारण बदनाम करण्याची मानसिकता बदलली पाहिजे. प्रत्येक वनस्पतीचे पर्यावरण अनुकूल महत्त्व असते. इथे निवडुंगाचे दोन प्रकार आढळतात. ते म्हणजे, काटेरी ते निवडुंग अन्‌ काटे नसलेले ते सक्युलंट. हे दोन्ही प्रकार मोठी बाग आणि घरातील बागांना आकर्षकता प्रदान करतात. निवडुंगांची, सक्युलंटस्‌ची शेती करता येते. यातून अर्थकारणाला गती येते. रोजगार मिळतो. अशा निवडुंग, सक्युलंटस्‌च्या जगाची माहिती घेऊया...
...

पाण्यासाठी विशेष रचना
निवडुंग जगभरात विविधांगी आकार घेऊन रणरणत्या वाळंवटातही उगवतात. निवडुंग परिसरातही दिसतात. फड्या निवडुंग कुंपणाशेजारी, उजाड रखरखत्या माळरानावर पाहिला असेल. खरेतर निवडुंग वनस्पतींचाच प्रकार. वनस्पतीतील पाणी बाष्पीभवन होऊन जाऊ नये, म्हणून या वनस्पतीत विशेष रचना केलेली आहे. निवडुंगाला काटे, लव, केस असतात. ते गवताळ प्रदेशातही दिसतात; तर रसाळ वनस्पतींना सक्युलंटस्‌ म्हणतात. अनेकदा सक्युलंटला ‘कॅक्टस''चाच प्रकार समजतो; पण तसे नाही. कॅक्टस्‌ सक्युलंट्सचाच ‘सबसेट’ (उपसंच) आहे. कॅक्टस्‌प्रमाणेच कमी पाण्यावर सक्युलंट जगते. पानात पाणी साठवून ठेवत ही छोटी झाडे बागांना, घरांना, फ्लॅटस्‌ला शोभा देतात.

दोन वर्षांपर्यंत पाण्याशिवाय
निवडुंग, सक्युलंटस्‌चा उपयोग रॉक गार्डनिंग, डिश गार्डनिंगमध्ये होतो. निवडुंग खडतर वातावरणात, निकृष्ट जागेत येतात; पण सक्युलंटस्‌ला कडक उन्हाळ्यात जपावे लागते. ते सकाळी ११ पर्यंतच उन्हात ठेवावे लागते. निवडुंगाप्रमाणेच सक्युलंटस्‌चे विविध प्रकार आहेत. जसे की, इकेव्हेरिया गट. वेगवेगळ्या रंगसंगतीत ते दिसते. निवडुंगांचे डचमन्स पाईप, सगवारो, अस्वल, पिंप कॅक्टस असे काही प्रकार आहेत. उदा. सगवारो कॅक्टस ५० फुटांपर्यंत वाढतो. तो २०० वर्षांपर्यंत जगतो. काही निवडुंग तर बोटाएवढेच असतात. इस्टर, ओल्ड लेडी, बनी इअर, ब्लू कॉलमनर, स्टार, बॅरल, फेयरी कॅसल, सागुआरो असे प्रकार आहेत. जिम्नोकॅलिसियम, मॅमिलरिया, पॅरोडिया कुटुंबांमध्ये काही प्रजातीला फुलेसुद्धा येतात. काही निवडुंग तर दोनशेपेक्षा जास्त वर्षांपर्यंत जगतात. कोणताही निवडुंग दोन वर्षांपर्यंत पाण्याशिवाय राहू शकतो. ४८ तासांत ते एक हजार लिटरपेक्षा जास्त पाणी शोषून घेतात, म्हणून निवडुंगांची मुळे खूप खोलवर जमिनीखाली गेलेली असतात.
...
चौकट
निवडुंगाचे फायदे
-ओपेनशिया गटातील विनाकाट्याचे कॅक्टसपासून जनावरांना चारा मिळतो
-कमी जागेत कॅक्टस्‌ गार्डनिंग तयार होते
-कर्करोगांसाह विविध विकारांवर उपयुक्त
-कॅल्शियम, जीवनसत्त्व ‘क’चा साठा
-आवाजाची तीव्रता शोषून घेतो

...
निवडुंगांचे प्रकार
निवडुंगांच्या १५०० प्रजाती, उपप्रजाती आहेत. यातील मम्मेलेरिया, जिम्नोकॅल्शियम, ॲस्ट्रेाफायटम, सेरस, टर्बिनकार्पस, हिल्थेविंतेरा, रेबुटिया, इचिनोस्पीस, लोबिव्हीया, इचिनो‌, मेलो, फेरो, डिस्को, थेप्रो कॅक्टस्‌ प्रकार महत्त्वाचे आहेत.

सक्युलंटस्‌चे प्रकार
सक्युलंटस्‌च्या प्रकारात चिनी गुलाब, अडेनियम, इचिवेरिया, क्रॅसुला, सिडम, युफोबिया, पॅचिपोडियम, ॲनोनियम, सेडेवेरिया, कोरफड, अगेव्ह, ॲबोर्थिया, पोर्तुलॅका, सेन्सेव्हेरिया, ग्राफ्टोफायलम, मिल्कविड, अनकॅरिना, लिथोप्स्‌, डॉरेस्टेनिया असे आकर्षक प्रकार आहेत.
...
कोटस्‌

कोरफड, ड्रॅगनफ्रुट वनस्पती म्हणजे निवडुंगांचेच प्रकार आहेत. भारतातून, परदेशातून ऑनलाईन मागवू शकतो. शंभर रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत निवडुंगाचे प्रकार विक्रीस उपलब्ध असतात. माझ्या घरांतील बागेत ३५ ते ३८ वर्षांपासूनचे निवडुंगांच्या काही प्रजातींची जपणूक केली आहे.
- जयश्री कजारिया.

सेन्सेवेरिआ गटातील सक्युलंटस्‌ हवेतील जड मूलद्रव्ये शोषतात. ट्रे गार्डनिंगमध्ये वेगवेगळ्या सुंदर रचना तयार करता येतात. कमी जागेत अनेक व्हरायटीज लावता येतात. ते विविधरंगी उधळण करतात, आजुबाजूची हवा शुद्ध ठेवतात, म्हणून सक्युलंटस्‌ वनस्पती बागेत जरूर ठेवा.
- अनिस पिंजारी, कुंभोज

गार्डन क्लबच्या दरवर्षीच्या प्रदर्शनात सक्युलंटस्‌, कॅक्टसचा स्टॉल लावतो. नवीन पिढी सक्युलंट, कॅक्टसची कुंडी कॉम्प्युटर टेबलवर ठेवते. या वनस्पतीतील नजाकत पाहत अभ्यास, काम करतात. क्रिएटिव्ह, ट्रे, मिनेचर गार्डनिंग संकल्पनेत कॅक्टस्‌, सक्युलंटस्‌ची ‘क्रेझ’ वाढली आहे. आम्ही सक्युलंट बुके देऊनच मान्यवरांचे स्वागत करतो.
- कल्पना सावंत, अध्यक्षा, गार्डन क्लब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com