‘एमपीएससी’चा नवा पॅटर्न सन २०२५ मध्ये लागू करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एमपीएससी’चा नवा पॅटर्न सन २०२५ मध्ये लागू करा
‘एमपीएससी’चा नवा पॅटर्न सन २०२५ मध्ये लागू करा

‘एमपीएससी’चा नवा पॅटर्न सन २०२५ मध्ये लागू करा

sakal_logo
By

83539
.........

‘एमपीएससी’चा नवा पॅटर्न
२०२५ पासून लागू करा

परीक्षार्थी, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सायबर चौकात निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः राज्यसेवा मुख्य परीक्षेचा (एमपीएससी) नवा पॅटर्न सन २०२५ पासून लागू करा, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे परीक्षार्थी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज निदर्शने केली. त्यांनी सायबर चौकात धरणे आंदोलन करत ‘शासनकर्ते जागे व्हा, आम्हाला न्याय द्या’, ‘खूप झाली दडपशाही, देशात हवी लोकशाही’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
जिल्हा व शहर युवक काँग्रेस आणि एमपीएससी विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रदेश काँग्रेसचे एमपीएससीच्या आंदोलनाचे निरीक्षक आशिष कोरी म्हणाले, ‘परीक्षा पद्धतीमधील बदल ही काळाची गरज आहे. मात्र, जुन्या पद्धतीप्रमाणे तयारीसाठी आयोगाकडून वेळ हवा आहे. आयोगाने परीक्षार्थींना येणाऱ्या अडचणी लक्षात घेतल्या पाहिजेत. वर्णनात्मक आणि बहुपर्यायी परीक्षेमधील प्रश्नांचे भिन्न स्वरूपही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’चा नवा पॅटर्न सन २०२५ मध्ये लागू करावा.’ या आंदोलनात युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष उदय पोवार, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार, ‘एनएसयूआय’चे शहराध्यक्ष अक्षय शेळके, अजित डवंग, राकेश कांबळे, राहुल मिनेकर, आनंदा करपे आदी सहभागी झाले.