हातकणंगले : सभापती निवडी

हातकणंगले : सभापती निवडी

ich174.jpg

83571
हातकणंगलेत विषय समिती बिनविरोध
शिवसेनेला चार, राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक सभापतीपद

हातकणंगले, ता. १७ : आज झालेल्या हातकणंगले नगरपंचायतीमधील विषय समितीच्या पाचही सभापतीच्या निवडी बिनविरोध पार पडल्या असून
यामध्ये शिवसेनेला चार तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक सभापतीपद देण्यात आले. भाजपला निवडीपासून दूरच ठेवल्याने राज्य शासनाच्या धर्तीवर हातकणंगले नगरपंचायतीमध्ये मात्र भाजपा आणि शिंदे गटाचे मनोमिलन झाले नसल्याचे या निवडीतून स्पष्ट झाले.
बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादीचे विजय खोत, शिक्षण व क्रीडा केतन कांबळे, पाणीपुरवठा अलका कांबळे, स्वच्छता व आरोग्य प्राजक्ता उपाध्ये आणि महिला व बालकल्याण सभापतीपदी सोनाबाई इरकर यांची आज बिनविरोध निवड झाली. निवडीसाठी बोलवलेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात होते.
हातकणंगले नगरपंचायतीमध्ये तीन वर्षं ‘मविआ’ची सत्ता आहे. चार महिन्यांपूर्वी राज्यांत राजकीय उलथापालथ होऊन शिंदे गट आणि भाजपाने एकत्र येत सरकार स्थापन केले. त्यानंतर हातकणंगले नगरपंचायतीमधील काही नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे त्याच धर्तीवर येथेही शिंदे गट आणि भाजपा एकत्र येणार का ?याबाबत सर्वांना उत्सुकता होती. त्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून काही नेतेमंडळींचे प्रयत्नही सुरू होते. मात्र त्या प्रयत्नांना यश आले नसल्याचे आजच्या निवडीनंतर समोर आले आहे. निवडीवेळी नगराध्यक्ष अरुणकुमार जानेवकर, मुख्याधिकारी विशाल पाटील व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com