हसन मुश्रीफ ईडी विरोध

हसन मुश्रीफ ईडी विरोध

हसन मुश्रीफ यांच्या
मुलांच्या जामिनाला ईडीचा विरोध


कोल्हापूर, ता. १७ ः सक्तवसुली संचलनालयाकडून माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल आहे. मात्र, ‘ईडी‘कडून मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करण्यात आला आहे.
श्री. मुश्रीफ यांच्या नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ या मुलांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. अर्जात राजकीय हेतूने अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, त्यांनी चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेले नाही. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावूनही ते हजर झालेले नाहीत. जामीन दिल्याने चौकशीवर परिणाम होईल. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात श्री. मुश्रीफ व त्यांची मुले संचालक आणि भागधारक आहेत. प्राथमिक चौकशीत कारखान्याला मोठ्या प्रमाणात पैसा आला असून तो कुठून आला याबाबत कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असेही ईडीने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com