इचलकरंजी बसस्थानकाचे शिवतीर्थ नामकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी बसस्थानकाचे शिवतीर्थ नामकरण
इचलकरंजी बसस्थानकाचे शिवतीर्थ नामकरण

इचलकरंजी बसस्थानकाचे शिवतीर्थ नामकरण

sakal_logo
By

01467
-------------
इचलकरंजी बसस्थानकाचे शिवतीर्थ नामकरण
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा निर्णय; आदेशाची प्रत प्राप्त
इचलकरंजी, ता. १७ : इचलकरंजी बसस्थानकाला शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानक असे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्या आदेशाची प्रत इचलकरंजी बसस्थानक प्रमुखांना शुक्रवारी मिळाली. आमदार प्रकाश आवडे व शहरातील अनेक संघटनांकडून बसस्थानाकाचे नाव बदलण्याची मागणी होती. त्यांच्या मागणीला अखेर यश आले असून येथून पुढे इचलकरंजी बसस्थानक हे श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानक या नावाने ओळखले जाणार आहे.
इचलकरंजी शहरातील बस स्थानकास छत्रपती शिवाजी महाराज असे नामकरण करण्याची मागणी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या संघटनांमार्फत करण्यात येत होती. १९ फेबुवारी २०२१ ला शिवजयंतीचे औचित्य साधून शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नामफलक आमदार प्रकाश आवडे याच्याहस्ते बसस्थानकास लावला होता. यावेळी बसस्थानकाच्या अधिकाऱ्‍यांना आमदार आवडे यांनी लवकरच रितसर परवानगीचे पत्र देण्याची ग्वाही दिली होती. मात्र बसस्थानकाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस संरक्षण घेवून फलक हटवला होता. याची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जाब विचारला. यावेळी फलक बेकायदेशीर असल्याचे कारण दिले. आमदार आवडे यांनी ही फलक पुन्हा लावण्याची विनंती केली होती. मात्र परवानगीशिवाय काही करता येत नसल्याचे पोलिस व बसस्थानकाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. आमदार प्रकाश आवडे यांनी बसस्थानकाच्या दारात ठिय्या आंदोलन छेडले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.