Sun, May 28, 2023

इचल : जल्लोष
इचल : जल्लोष
Published on : 17 February 2023, 5:40 am
83572
इचलकरंजी शिंदे गटाचा जल्लोष
इचलकरंजी ः निवडणूक आयोगांने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर येथे शिंदे समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. मलाबादे चौकात एकत्र येत साखर-पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी विजयाचा घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी केली. जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आनंदोत्सवात माजी नगरसेवक भाऊसाहेब आवळे, रवींद्र लोहार, नागेश पाटील, शिवाजी जगताप, विजय पाटील, सुशील खैरमोडे, विनायक काळे, लखन कांबळे, संदीप माने, हेमंत कांबळे सहभागी झाले होते.