आपल शहर आपल बजे
आपल शहर आपलं बजेट

आपल शहर आपल बजे आपल शहर आपलं बजेट

83591
कोल्हापूर : ‘सकाळ’च्या आपलं शहर, आपलं बजेट उपक्रमात क्रीडाई कार्यालयात बांधकाम क्षेत्रावर सविस्तर चर्चा करताना प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, के. पी. खोत, निखिल शहा, पवन जामदार, संदीप मिरजकर, गौतम परमार, प्रदीप भारमल आदी.


उद्यान, पार्किंग सुविधा सुधाराव्यात
महापालिका उत्पन्न वाढीस वाव; बांधकामांना हेलपाटे न मारता परवानगी मिळावी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : शहराची हद्दवाढ व्हावी, बांधकामांना हेलपाटे न मारता परवानगी मिळावी, उद्यान, पार्किंग सुविधा सुधाराव्यात यातून महापालिकेचे उत्पन्न वाढू शकेल, महापालिकेची अर्थिक स्थिती भक्कम होईल आणि शहर विकासाला गती मिळेल, अशा तरतुदी महापालिका अर्थसंकल्पात व्हाव्यात, अशी अपेक्षा ‘सकाळ’च्या ‘आपलं शहर, आपलं बजेट’ या उपक्रमात बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच क्रीडाई संस्थेच्या मान्यवरांनी व्यक्त केली.
या वेळी मान्यवरांनी महापालिकेला अर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासोबत शहर विकासाला गती देणारे विविध पर्याय सुचवले. यात रस्ते सक्षमीकरणावर बहुतेकांनी भर दिला. शहरातील बांधकाम परवानगीसाठी हेलपाटे मारावे लागतात, ३० टक्के मिळकतीच्या घरफाळा वसुलीत अनेक त्रुटी आहेत. ओपन स्पेसचा उत्पन्न वाढीसाठी वापर होत नाही, अशा उणीवांमुळे महापालिकेला कोट्यवधीच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागते. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करताना महापालिकेची येणाऱ्या मिळकतधारक, करदात्यांना झटपट सेवा मिळेल, कर वसुली जोमाने होईल, यातून महापालिकेचे अर्थिक स्थिती भक्कम होऊन तेव्हाच पायाभूत सुविधा सक्षमपणे मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. रंकाळा चौपाटी, मैदाने, उपनगरातील चौफेर ओपन स्पेसमध्ये चांगल्या सुविधांसह गाळे बांधकाम झाल्यास लोक उपनगरात राहण्यास प्राधान्य देतील. तेव्हा शहरातील ताण कमी होण्यास मदत होईल, असे मतही मान्यवरांनी व्यक्त केले.
-----------------
सूचना अशा
- पे ॲण्ड पार्कसाठी जागांचा वापर व्हावा
- काही उद्यानाचे मनोरंजक स्वरूपात बदल करावा- हॉकर्स झोनद्वारे महापालिकेने गाळे उभे करावेत
- महापालिकेचा क्रशर, डांबरीकरण प्रकल्प पनर्जीवीत करावा
- उपनगरातील जागा ग्रीन झोनमधून यलो झोन करावा
- ताराबाई रोडसह मध्यवर्ती भागातील पार्किंग सक्षम करावी
------------------
प्रकाश देवलापूरकर (उपाध्यक्ष, क्रीडाई) : शहराची आडवी वाढ होण्याऐवजी उभी वाढ होत आहे. अनेक प्रकल्पांचा निधी परत जातो किंवा इतरत्र वर्ग होतो. त्यासाठी योग्य नियोजनाद्वारे निधी त्याच विकासकामांवर खर्च व्हावा. ड्रेनजलाईन, रस्ते रुंदीकरण, पाणीपुरवठा आदी सुविधा सक्षम कराव्यात.
चेतन वसा (उपाध्यक्ष, क्रीडाई) : शहरात लोक आले, तर अर्थिक उलाढाल वाढते. त्यासाठी कोल्हापुरात फूड पार्क तयार व्हावा. जेणे करून आलेल्या लोक येथे थांबून राहतील. त्यासाठी ओपन स्पेसचा विनियोग होऊ शकेल.
प्रदीप भारमल (बांधकाम व्यावसायिक) : दळण-वळण यंत्रणा व्यवस्थित व्हावी. रेल्वे चार पाच शहरे वगळता इतरत्र जात नाहीत, ही संख्या वाढावी. ओपन स्पेसचा वापर उत्पन्न वाढीसाठी करावा. शहरापासून शंभर किलोमीटरवर समुद्र किनारा आहे. कोकणाची बाजारपेठ मिळवण्यासाठी शहर विकास पूरक ठरणार आहे.
के. पी. खोत (बांधकाम क्षेत्राचे अभ्यासक) : शहर विकास आरखडा दर दहा वर्षांनी होतो, मात्र त्यानुसार रस्ते विकास होत नाहीत. महापालिकेचा अस्थापनावर ६२ टक्के खर्च होतो. त्यामुळे महापालिकेकडे रस्त्यासाठी बजेट नाही. शासनाकडून निधी घेऊन रस्ते केले तरच बांधकाम क्षेत्र वाढू शकेल.
संदीप मिरजकर (बांधकाम व्यावसायिक) : ज्या भागात शाळा चांगल्या दुकाने, चांगली तेथे घर घेण्यावर ग्राहकांचा भर असतो. त्यामुळे महापालिकेने शाळांची, बाजारपेठेची सुविधा चांगली केल्यास उपनगरीय भागातील घरे घेणाऱ्यांची संख्या वाढेल; शहरातील ताण कमी होईल.
गौतम परमार (संचालक, क्रीडाई) : महापालिकेने घरफाळा वसुली सुसूत्रता आणली व पाणी चोरीला आळा घातला, पे पार्किंगची सोय केली, तर महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल.
निर्मल शहा (सहसचिव, क्रीडाई) : शहराची हद्दवाढ व्हावी, उपनगरातील पायाभूत सुविधा व्यावसायिक गाळे उद्यान विकसित केल्यास तेथील बांधकाम क्षेत्राला उपयोग होईल.
पवन जामदार (खजानीस, क्रीडाई) : शहरातील डीपी रस्ते सक्षम व्हावेत. प्रस्तावित अपार्टमेंट प्रकल्पांना डीपी रस्ते जोडले जावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com