
सुमंगल लोकोत्सव
सुमंगलम लोकोत्सवासाठी
केएमटीची मोफत बस सेवा
कोल्हापूर, ता. १८ ः कणेरीच्या सिद्धगिरी मठावर सोमवारपासून (ता. २०) सुरू होत असलेल्या सुमंगलम लोकोत्सवासाठी २० ते २६ फेब्रुवारी या काळात महापालिकेच्या परिवहन उपक्रमांतर्गत केएमटीची मोफत विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
या महोत्सवास उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने गंगावेश येथून जादा बसेस सोडण्यात येतील. पहाटे सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध असेल. या मोफत सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पहिला मार्ग (जाताना) :- गंगावेश – छ. शिवाजी महाराज चौक - एस.टी.स्टँड - ताराराणी चौक - ओपल हॉटेल - शिवाजी विद्यापीठ - शाहू नाका - कणेरी मठ फाटा – एमएसईबी कार्यालयापासून कार्यक्रम स्थळाजवळ.
दुसरा मार्ग (जाताना):- गंगावेश - छ. शिवाजी महाराज चौक - उमा टॉकीज - रेल्वे फाटक - राजारामपुरी – सायबर इन्स्टिट्यूट - शिवाजी विद्यापीठ - शाहू नाका - कणेरी मठ फाटा – एमएसईबी कार्यालयापासून कार्यक्रम स्थळाजवळ मार्गे कणेरी मठ.
येताना मार्ग :- कार्यक्रमस्थळावरुन येताना एकेरी मार्ग असल्याने सर्व बसेस - कंदलगाव - कंदलगाव नाका – रिंग रोडने शांतीनिकेतन - शिवाजी विद्यापीठ - ओपल हॉटेल - ताराराणी चौक – एस.टी.स्टँड - रेल्वे स्टेशन – छ. शिवाजी महाराज चौक - गंगावेश असा मार्ग राहील.
..........