Wed, May 31, 2023

शिप्पूर शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
शिप्पूर शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
Published on : 18 February 2023, 1:06 am
शिप्पूर शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : शिप्पूर तर्फ आजरा (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत अध्यक्ष चषक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळविले. संभाजीनगरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात या स्पर्धा झाल्या. वरिष्ठ गटात धीरज सागर (६०० मीटर धावणे प्रथम क्रमांक व लांब उडी तिसरा क्रमांक), गणेश गुंडप (४०० मीटर धावणे प्रथम क्रमांक), गणेश पारळे (२०० मीटर धावणे दुसरा क्रमांक) यांनी यश मिळविले. मुख्याध्यापक प्रकाश पन्हाळकर, पद्मश्री गुरव, निवृत्ती शेवाळे, घनश्याम सुतार यांचे मार्गदर्शन मिळाले. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळाले.