पोलिस वृत्त एकत्रित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त एकत्रित
पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

sakal_logo
By

ओव्हरटेक करताना अपघात, तरुणी जखमी

कोल्हापूर ः पापाची तिकटीमार्गे बुरुड गल्लीत जात असताना उजव्या बाजूने ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात फिर्यादी पूनम प्रवीण पाटील (वय ३३, जुना बुधवार पेठ) या जखमी झाल्या. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजेंद्र भगतसिंग निगवेकर (वय ४०, रा. पांढरबळे शाळेजवळ, सदर बाजार) यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, अपघातात फिर्यादींची आई प्रतिभा लोखंडे यांच्या डाव्या खांद्यास व डाव्या पायास मार लागून फ्रॅक्‍चर झाले आहे, तर पूनम यांच्या डोक्यास व पाठीत मुक्का मार लागून त्या जखमी झाल्या झाल्या आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------

घराच्या वाटणीसाठी मुलाची आईला मारहाण

कोल्हापूर ः- घराची वाटणी देण्याच्या कारणावरून मुलाने आईला मारहाण केली. जिल्हा परिषद कॉलनी परिसरातील शिंदे कॉलनीत शुक्रवारी ही घटना घडली. यामध्ये आनंदी शिवाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मुलगा सुनील शिवाजी पाटील याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी आनंदी या ६२ वर्षांच्या आहेत. त्या शिंदे कॉलनीत राहतात. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मुलगा सुनील हा त्यांच्या राहत्या घरात गेला. ‘मला घराची वाटणी करून दे’ असे म्हणून डोकीत व उजव्या हाताच्या मनगटावर काठीने मारहाण केली. यावेळी सून सोडविण्यासाठी आली असता तिच्याही डोक्यात व डोळ्यावर काठीने मारहाण करून शिवीगाळ केली. पुन्हा मारण्याची धमकी दिल्यामुळे फिर्यादी आनंदी यांनी सुनील याच्यावर गुन्हा दाखल केला.

---------------

पिरवाडी येथे ६८ हजारांचे दागिने चोरीस

कोल्हापूर ः पुईखडी पिरवाडी (ता. करवीर) येथील पोस्टल कॉलनीमध्ये बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने सुमारे ६८ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याची फिर्याद मोहसीन इब्राहिम मुजावर यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली. फिर्यादी मोहसीन हे मूळचे पन्हाळा येथील रहिवासी आहेत. १४ ते १७ फेब्रुवारीदरम्यान ते परगावी गेले होते. या काळात पोस्टल कॉलनीतील त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यांच्या घरातील सात ग्रॅमची सोन्याची चेन, एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, पाच भाराचे चांदीचे पैंजण असा सुमारे ६८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याबाबतची फिर्याद मोहसीन यांनी काल करवीर पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीसह इतर माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे. रेकॉर्डवरील चोरट्यांचाही या चोरीशी संबंध आहे काय, याचीही माहिती पोलिस घेत आहेत.