महाशिवरात्री उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाशिवरात्री उत्साहात
महाशिवरात्री उत्साहात

महाशिवरात्री उत्साहात

sakal_logo
By

83712
कोल्हापूर : महाशिवरात्रीनिमित्त गंगावेशमधील ऋणमुक्तेश्वर मंदिरातून श्री महादेवाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मिरवणुकीला सुरुवात केली. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
83710
कोल्हापूर : महाशिवरात्रीनिमित्त रावणेश्‍वर मंदिरात श्री महादेवाची प्रदोष नृत्य रूपातील मांडलेली पूजा.
(मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------

हर हर शंभो...
---
महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिरात अभिषेक, महापूजा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : हर हर महादेव..., ओम नमः शिवाय..., भोलेनाथ की जय... असा अखंड जयघोष आणि भजन, भावगीतांत शहर व जिल्ह्यातील महादेव मंदिरांत भक्तिमय वातावरण होते. विविध मंडळांनी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध स्पर्धांचे आयोजन करून महाशिवरात्री पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी झाली.
शहरात मंगळवार पेठेतील रावणेश्‍वर, कैलासगडची स्वारी मंदिर, उत्तरेश्‍वर पेठ, अंबाबाई मंदिर, ऋणमुक्तेश्‍वर मंदिर, जुना बुधवार पेठेतील श्री सिद्धेश्‍वर महादेव, पंचगंगा घाट येथील तारकेश्‍वर मंदिर, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वटेश्‍वर, रंकाळा चौपाटी येथील महादेव मंदिरात आज दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी शिवलिंगाची अभिषेक घालून बेल, भस्म लावून पूजा करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणी भजन, सोंगी भजन, भाव-भक्तिगीतांचा कार्यक्रमही झाला. मंदिराच्या परिसरात फुले- बेल, खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल थाटले होते. दरम्यान, पंचगंगा घाटावरील तारकेश्‍वर मंदिरात रुद्राभिषेक व महापूजा विधी झाला. छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक धनाजी खोत यांच्या हस्ते अभिषेक झाला. सुनील कुलकर्णी यांचे पौरोहित्य होते. रुद्र मुजूमदार यांनी नियोजन केले. रावणेश्‍वर मंदिरात प्रदोष रूपातील पूजा बांधण्यात आली होती. उपनगरातील महादेव मंदिरांतही महाशिवरात्री उत्सव उत्साहात झाला. मोरेवाडी व शिवशक्ती हौसिंग सोसायटीमधील शिव मंदिरात आकर्षक पूजा बांधण्यात आली. ऋणमुक्तेश्‍वर मंदिराचा सायंकाळी पालखी सोहळा झाला. उद्या (ता. १९) दुपारी विविध महादेव मंदिरांत महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
------
चौकट
फुले, बेलपानांतून वाढली कमाई
फुलांच्या बाजारात सुगंधी विशेषतः पांढऱ्या फुलांना मागणी होती. कर्दळी, मोगरा, जाई, चाफा अशा फुलांचे सुटे ढीग २० ते ३० रुपयांना विकले गेले. ग्रामीण भागातून अनेकांनी बेलपाने विक्रीसाठी आणली. त्याचा दरही २५ रुपये ढीग असा होता.