आजरा ः पेरणोली हरपवडे जंगलात वणवा

आजरा ः पेरणोली हरपवडे जंगलात वणवा

पेरणोली, हरपवडे जंगलाला वणवा
आजरा, ता. १८ ः आजरा तालुक्यात वणव्याचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी कोरीवडे (ता. आजरा) येथे सोनार व नंबर शेतात लागलेल्या वणव्यात काजूच्या बागा व वीस गवत गंज्या जळून गेल्या होत्या. ही बाब ताजी असतानाच पेरणोली व हरपवडे या जंगलाला वणवा लागला. यामध्ये सुमारे दोनशे एकरचा परिसर खाक झाला आहे. रात्रभर जंगल परिसर आगीच्या ज्वाळांनी वेढला होता. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आठ दिवसांत तालुक्यात वणव्याच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. चार दिवसांपूर्वी आजऱ्यातील वनाैषधी पार्कचा परिसर वणव्यात जळाला. त्याचबरोबर पारेवाडी परिसरातही आग पसरली होती. कोरीवडेमध्ये सुमारे पन्नास एकरचा परिसर जळाला. ही घटना होते तोपर्यंत शुक्रवारी रात्रभऱ पेरणोली व हरपवडे जंगल परिसर ज्वालांनी वेढला होता. यामध्ये सुमारे दोनशे एकरचा परिसर जळून गेला आहे. आज सकाळीही आग धुमसत होती. त्यामुळे तालुक्यातील वणवे रोखण्यासाठी वन विभागाने यंत्रणा उभी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com