या जन्मावर.. मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

या जन्मावर.. मालिका
या जन्मावर.. मालिका

या जन्मावर.. मालिका

sakal_logo
By

83727
....
उत्पादन शुल्क विभागाकडून दोघांना अटक

गोवा बनावटीच्या दारूचे ५ लाख रुपये किमतीचे ५७ बॉक्स जप्त

कोल्हापूर, ता. १८ : शिवजयंतीला असलेल्या ‘ड्राय डे’ला विक्रीसाठी आणलेल्या दारूसाठ्यावर आज राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून दोघांना अटक केली. अनिकेत अरुण पाटील (३२, रा. शाहूमिल कॉलनी, राजारामपुरी) आणि इंद्रजित संताजीराव घोरपडे (४५, रा. साईनाथ कॉलनी, लाईन बाजार, कोल्हापूर) अशी त्यांनी नावे आहेत. शाहू मिल कॉलनी आणि पांजरपोळ औद्योगिक वसाहतीत छापा टाकून त्यांच्याकडून गोवा बनावटीच्या दारूचे ४ लाख ९३ हजार ६८० रुपये किमतीचे ५७ बॉक्स जप्त केल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या शिवजयंती उत्सवामुळे ‘ड्राय डे’ जाहीर केला आहे. याचा फायदा घेत काही दारू तस्करांनी गोवा बनावटीच्या दारूचा साठा केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार दुपारी तीनच्या सुमारास पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संशयितांच्या घरावर छापे टाकले. तेथे घरात गोवा बनावटीच्या मद्याचे ४ लाख ९३ हजार ६८० रुपये किमतीचे ५७ बॉक्स आढळले. ते जप्त करून दोघांना अटक केली. अधिक चौकशी सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.