मिरजकर तिकटी शिवजयंती

मिरजकर तिकटी शिवजयंती

८३७२६
महानाट्यातून शिवकतृत्वाला वंदन
‘प्रतापगड शिवसंग्राम’ सादर; मावळा कोल्हापूरतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ,ता. १८ : बुलंद संवाद फेक, उत्कृष्ठ रंग व वेशभूषा, भारदस्त अभिनय अशा भक्कम पाठबळावर संस्थेच्या कलावंतांनी सादर केलेल्या ‘प्रतापगडचा शिवसंग्राम’ या महानाट्याने शिवकतृत्वाला उजाळा दिला. छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांच्यातील संघर्षापासून ते जावळी खोऱ्यात मिळविलेल्या विजय, स्वराज्य रक्षणाची उर्जा देणारे प्रसंग हुबेहुब साकारत या महानाट्याने उपस्थितांच्या मनात रोमांच उभे केले.
येथील मावळा कोल्हापूर ग्रुपतर्फे सुरू असलेल्या शिवजयंती सोहळ्यात प्रतापगड संग्राम महानाट्याचा प्रयोग सलग दुसऱ्या दिवशी सादर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांच्या बळावर स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. शत्रुच्या ताब्यातील मुलुख जिंकून घेतले. छोटे छोटे प्रदेश जिंकत जावळीचे खोरेही जिंकले. यासह विविध प्रसंग महानाट्यात मांडले.
मावळा ग्रुपच्या कलावंतांनी ही या महानाट्यात विविध भूमिका वठवल्या. सचिन कडवेकर, राजू मेवेकरी, बाबा पार्टे, विठ्ठल कोतेकर, प्रशांत जाधव, उदय फाळके, शाहू जाधव, संदीप सुर्यवंशी आदीच्या उपस्थितीत दिपक महाडीक, कोरोनाकाळात मदत कार्य करणारे प्रा. डॉ. अमर जाधव, विविध उत्सवात मोफत सजावट करणाऱ्या दिपाली मगदूम, फुटबॉल प्रशिक्षक शिवाजी पाटील यांचे सत्कार करण्यात आले.
मावळा ग्रुप तर्फे उद्या रविवार (ता.१९) शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे. या वेळी आमदार जयश्री जाधव, मधूरिमाराजे छत्रपती प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर प्रतापगडचा शिवसंग्राम हे महानाट्य सादर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com