‘बालाजी’मध्ये पारितोषिक वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बालाजी’मध्ये पारितोषिक वितरण
‘बालाजी’मध्ये पारितोषिक वितरण

‘बालाजी’मध्ये पारितोषिक वितरण

sakal_logo
By

‘बालाजी’मध्ये पारितोषिक वितरण

इचलकरंजी : बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक पारितोषिक समारंभ झाला. डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल हे प्रमुख पाहुणे होते. या वेळी त्यांनी आनंदी जीवन जगण्याची मूल्ये याबाबत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक डी. एल. मिटके यांनी स्कूलच्या प्रगतीचा वार्षिक अहवाल सादर केला. विद्यार्थिनी श्रीशा कोलार हिने पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थी राजवीर उरणे याने विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक मदन कारंडे यांनी भूषवले. महेश कोळीकाल, आर. डी. पाटील, संजय जाधव, गजानन कडोलकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ए. ए. मेळवंकी व ए. एस. भोकरे यांनी केले. जी. व्ही. म्हेत्रे यांनी आभार मानले.
----------------------
ich195.jpg
83744
इचलकरंजी : स्नेहसंमेलन कार्यक्रमास विद्यर्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान केली होती.
जयभवानी विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन
इचलकरंजी : जयभवानी विद्यामंदिर क्रमांक अकरा या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे झाला. अध्यापक प्रकाश पाटील यांनी लिहिलेल्या मुलांचे कलाम चाचा या पुस्तकाचे प्रकाशन झाले. उपायुक्त प्रदीप ठेंगल, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख, पोलिस उपनिरीक्षक आणि माजी विद्यार्थिनी करिष्मा शेख, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, प्रशासनाधिकारी नम्रता गुरसाळे, क्रीडा अधिकारी शंकर पोवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भारती राजपूत तर आभार आकाश पाटील यांनी मानले.
------------------
बारावी परीक्षा बैठक व्यवस्था
इचलकरंजी : येथील गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स या मुख्य केंद्रावर शहरातील विज्ञान शाखेची बैठक व्यवस्था केली आहे. ती अशी : मुख्य केंद्र (गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स) - X०५११५३ ते X०५१७७७. उपकेंद्र (व्यंकटराव हायस्कूल) - X०५२०२९ ते X०५२३८९, व्होकेशनल शाखा (उपकेंद्र शाहू हायस्कूल) - X११९९१७ ते X१२००४४.

-------------------
नवचैतन्य बालगृहाचे यश
इचलकरंजी : सांगली येथे विभागीय बाल महोत्सव झाला. यामध्ये पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील बालगृहातील प्रवेशितांनी सहभाग घेतला होता. बालगृहातील बालकांच्या विविध क्रीडा स्पर्धा व बौद्धिक स्पर्धा झाल्या. मुलांचे चित्रकला स्पर्धेमध्ये नवचैतन्य बालगृहाच्या शंतनू सदानंद कांदेकर याने बाल कामगार या विषयावर काढलेल्या चित्राला द्वितीय क्रमांक मिळाला. त्याला महिला व बालविकास विभागीय उपायुक्त संजय माने व अधिकारी सुवर्णा पवार यांच्याहस्ते पारितोषिक देऊन गौरव केला.
-------------------
83745
प्रा. डॉ. सुभाष इंगळे यांची निवड
इचलकरंजी : दत्ताजीराव कदम आर्टस्‌ अँड कॉमर्स महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष इंगळे यांची शिवाजी विद्यापीठ अभ्यास मंडळावर नियुक्ती केली आहे. कुलगुरूंनी केलेल्या सदस्य नियुक्तीचे पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले आहे. प्रा. इंगळे हे डीकेएएससी महाविद्यालयात अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. त्यांनी रामलिंग, धुळोबा, बाबूजमाल, बाहुबली, नरंदे हिल्स येथील औषधी वनस्पतीचा अभ्यास केला आहे. निवडीबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभय साळुंखे, संस्था सचिवा शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्रा. राजेंद्र शेजवळ, प्रा. अनिल पाटील यांच्याकडून अभिनंदन केले.
------------------
ich197.jpg
83746
इचलकरंजी : जिल्हा उपशिक्षणाधिकारी जाधव यांचे हस्ते विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात आले.

खो-खो स्पर्धेत संजीवनचे यश
इचलकरंजी : जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक खो-खो क्रीडा स्पर्धेत संजीवन चंदूर शाळेच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत १२ तालुका विजेत्या संघाचा सहभाग होता. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुदाम पांडव, क्रीडाशिक्षक अमित कांबळे, जावेद अपराज, चंद्रकांत कांबळे आदींचे मार्गदर्शन लाभले.