पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

शेळ्या आडव्या आल्याने रिक्षा उलटली,
राजापूरचे आई-मुलगा जखमी

कोल्हापूरः नातेवाइकांना भेटण्यासाठी कोल्हापुरात येणारे माय-लेक आज सकाळी अपघातात जखमी झाले. शेळ्या आडव्या आल्यामुळे त्यांची रिक्षा उलटून पोहाळे तर्फ कळे (ता.पन्हाळा) येथे हा अपघात झाला. यामध्ये चंद्रकला चंद्रकांत करंबेळकर (वय ७२) आणि गुरुप्रसाद चंद्रकांत करंबेळकर (वय ४२, दोघे रा. राजापूर, जि. रत्नागिरी) हे दोघे जखमी झाले. पोलिसांनी सांगितले की, राजापूर येथील करंबेळकर माय-लेक हे रिक्षातून कोल्हापुरात येत होते. यावेळी पोहाळे तर्फ कळे येथे अचानक शेळ्या आडव्या आल्या. त्यामुळे चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात चंद्रकला आणि त्यांचा मुलगा गुरुप्रसाद हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
-------------

दुचाकी घसरून तरुण जखमी

कोल्‍हापूरः दुचाकी घसरून कसबा बावडा येथील वॉटर पार्कजवळ झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. प्रवीण सूर्यकांत नरसाळे (वय ३०, रा. मोरेवाडी, आर.के. नगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी प्रवीण बेशुद्ध असताना अग्निशामकच्या जवानांनी त्यांच्या गाडीतून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले.
---------
दुचाकीचा टायर फुटून दाम्पत्य जखमी

कोल्हापूरः दुचाकीचा टायर फुटून झालेल्या अपघातात दाम्पत्य जखमी झाले. मारुती रामा कोरवी (वय ३८) आणि शोभा मारुती कोरवी (वय २६, दोघेही रा. वंदूर, ता. कागल) अशी जखमींची नावे आहेत. पुणे-बंगळूर महामार्गावर हिटणी फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला. निपाणीत प्रथमोपचार घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केल्याची माहिती सीपीआर पोलिस चौकीतून देण्यात आली.
--------

तणनाशक प्यायलेल्या तरुणीचा मृत्यू

कोल्हापूरः ऐतवडे खुर्द (ता.वाळवा, जि.सांगली) येथील तणनाशक प्यायल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या तरुणीचा आज पहाटे सीपीआरमध्ये मृत्यू झाला. प्रियांका सचिन पाटील (वय ३०) असे तरुणीचे नाव आहे. शनिवारी (ता.१८) राहत्या घरी तिने तणनाशक प्यायले होते. त्यामुळे नातेवाइकांनी तिला सीपीआरमध्ये दाखल केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com