बनावट ई-मेलद्वारे ‘न्यू कॉलेज’मधील भरतीचे उमेदवारांना संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट ई-मेलद्वारे ‘न्यू कॉलेज’मधील भरतीचे उमेदवारांना संदेश
बनावट ई-मेलद्वारे ‘न्यू कॉलेज’मधील भरतीचे उमेदवारांना संदेश

बनावट ई-मेलद्वारे ‘न्यू कॉलेज’मधील भरतीचे उमेदवारांना संदेश

sakal_logo
By

बनावट ई-मेलद्वारे
नोकरभरतीचे संदेश

कोल्हापूर, ता. १९ ः येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष के. जी. पाटील आणि न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्या नावाने अज्ञाताने बनावट ई-मेल करून कॉलेजमधील प्राध्यापक पदभरतीच्या प्रक्रियेतील उमेदवारांना आज दुपारी संदेश पाठविले. ते समजताच कॉलेज प्रशासनाने सायबर सेलकडे तक्रार केली.
‘न्यू कॉलेजमधील प्राध्यापकांच्या ११ पदांच्या पूर्णवेळ भरती प्रक्रियेअंतर्गत ९ ते १४ फेब्रुवारीदरम्यान मुलाखत आणि निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, कोणी अज्ञाताने माझ्या आणि संस्थेच्या चेअरमन यांच्या नावाने बनावट ई-मेल तयार करून उमेदवारांना भरतीबाबतचे संदेश पाठविले. त्यात संबंधिताने भरतीबाबत संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे. त्याची माहिती आज दुपारी आम्हाला समजली. त्यावर सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे. ज्यांना या ई-मेलद्वारे संदेश प्राप्त झाले असतील, तर ते अनधिकृत असून, त्यावर कोणीही विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन प्राचार्य डॉ. पाटील यांनी केले.