रेडेकर महाविद्यालयाचे शिबीर उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडेकर महाविद्यालयाचे शिबीर उत्साहात
रेडेकर महाविद्यालयाचे शिबीर उत्साहात

रेडेकर महाविद्यालयाचे शिबीर उत्साहात

sakal_logo
By

रेडेकर महाविद्यालयाचे शिबिर उत्साहात
गडहिंग्लज, ता. २० : येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाचे भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे श्रमसंस्कार शिबिर उत्साहात झाले. आरोग्य तपासणीसह व्याख्यान झाले.
सरपंच वंदना शेंडूरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्‍घाटन झाले. रामाप्पा करिगार अध्यक्षस्थानी होते. मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर झाले.शिबिरात २१० रुग्णांची तपासणी केली. डॉ. अनिल चंदनशिवे, डॉ. मुक्तेश्वरी पाखरे यांनी उपचार केले. दुसऱ्या सत्रात योगासनांची प्रात्यक्षिके घेतली. डॉ. दीपक वाली व तानाजी डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. अपचन या विषयावर पथनाट्य झाले. कल्लेश्वर हायस्कूलच्या किशोरवयीन मुलींसाठी व्याख्यान झाले. डॉ. सोनाली शुक्ल व डॉ. मोनिका पाटील यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात गुड्डादेवी डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवली. महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी केली. शिबिराला संस्थेच्या अध्यक्षा अंजना रेडेकर, उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, सचिव सुनील शिंत्रे यांनी भेट दिली. प्राचार्या डॉ. वीणा कंठी, प्रकल्प अधिकारी डॉ. सपना बसर्गे यांनी नियोजन केले.