समर्थ मोटर्समध्ये सवलत योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समर्थ मोटर्समध्ये सवलत योजना
समर्थ मोटर्समध्ये सवलत योजना

समर्थ मोटर्समध्ये सवलत योजना

sakal_logo
By

समर्थ मोटर्समध्ये सवलत योजना
गडहिंग्लज, ता. २० : हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत वितरक येथील समर्थ मोटर्सतर्फे २३ व्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी सवलत योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समर्थ मोटर्सचे संचालक अमरनाथ घुगरी आणि आलोक घुगरी यांनी केले आहे.
वर्धापनदिनानिमित्त २१ ते २८ फेब्रुवारी अखेर ग्राहकांना रोख सवलतीचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये स्प्लेंडर प्लसवर ५ हजार, एचएफ डिलक्स खरेदीवर ३५०० रुपये, सुपर स्प्लेंडर व डेस्टिनी/प्लेजर प्लस स्कूटरवर ५ हजार, ग्लॅमर एक्सटेकवर ४ हजार, व एक्स्ट्रीम वन सिक्स्टी आर खरेदीवर १० हजार रुपये रोख सवलत मिळणार आहे. तसेच गाडीला लागणारे सर्व अ‍ॅक्सेसरीज मोफत उपलब्ध करण्यात येणार आहेत. ग्राहकांसाठी जुन्या हिरो किंवा हिरो पेड सर्व्हिंसिंग लेबरवर ५० टक्के सवलत व वॉशिंग फ्रीची योजना उपलब्ध केली आहे. हिरोच्या सर्व मोटारसायकल व स्कूटर, सर्व कलर हजर स्टॉकमध्ये आहेत. गाडी खरेदीसाठी ९० टक्क्यांपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल. माहितीसाठी ग्राहकांनी संकेश्‍वर रोडवरील रेशीम उद्योग केंद्राजवळच्या समर्थ मोटर्सच्या शोरूमला भेट देण्याचे आवाहन केले आहे.