
गड-देसाई हॉस्पिटल
देसाई हॉस्पिटलतर्फे आरोग्य शिबिर
गडहिंग्लज : येथील देसाई हॉस्पिटलतर्फे पिंपळगाव (ता. भुदरगड) येथे आरोग्य तपासणी शिबीर झाले. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत झालेल्या या शिबिरात १३७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. पिंपळगावसह बेलेवाडी हुबळगी, झुलपेवाडी, बेगवडे, दिंडेवाडी, बामणे, धामणे, पांगीरे या गावातील रुग्णांची तपासणी झाली. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर देसाई, डॉ. रोहित देसाई, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. दीशा राणे-देसाई यांनी रुग्णांची तपासणी केली. माजी सभापती विश्वनाथ कुंभार यांचे शिबिरासाठी सहकार्य मिळाले. जगदीश पाटील, दत्तात्रय कुंभार, डॉ. चंद्रकांत परुळेकर, डॉ. विनायक पाटील, डॉ. भरत पाटील, डॉ. संभाजी जगताप, डॉ. ऋतुराज मगदूम, डॉ. टी. एस. पाटील, डॉ. किरण मगदूम, अजित भोईटे यांच्यासह ग्रामपंचायत, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.