शिवाजी पेठ भूषण ''  पुरस्कार

शिवाजी पेठ भूषण ''  पुरस्कार

84213
कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळ शिवजयंती उत्सव समिती तर्फे कोल्हापुरातील विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या गुणवंतांचा ‘शिवाजी पेठ भूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी अध्यक्ष सुजित चव्हाण, उपाध्यक्ष अजित राऊत, महेश जाधव, लाला गायकवाड, ऋतुराज सरनोबत, प्रसाद इंगवले, सारंग पाटील, तेजस मोरे, अनिकेत सरनाईक, रवींद्र साळोखे, मोहन साळोखे.


गुणवंतांचा ‘शिवाजी पेठ भूषण’ पुरस्काराने सन्मान
सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर, ता. २० : शिवाजी तरुण मंडळ शिवजयंती उत्सव समिती तर्फे कोल्हापुरातील विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या मान्यवरांचा ‘शिवाजी पेठ भूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हे सत्कार शिवाजीपेठ भूषण असलेतरी सत्कारमूर्ती हे संपूर्ण कोल्हापूरचे भूषण आहेत, असे मत अजित राऊत यांनी व्यक्त केले.
शिवजयंतीनिमित्त सुरू असलेल्या सप्ताहामध्ये विविध स्पर्धा व्याख्यान आयोजित केले होते. आज कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांना ‘शिवाजी पेठ भूषण’ पुरस्कार देण्यात आला. यामध्ये राष्ट्रपती पदक विजेते पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, गिर्यारोहक कस्तुरी दीपक सावेकर, सीए परीक्षेत यश मिळविलेले मयूरी जगदीश साळोखे, बाल गिर्यारोहक अन्वी चेतन घाटगे, राष्ट्रपती शौर्य पदक विजेते नामदेव सावंत यांचा समावेश होता. शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, उपाध्यक्ष अजित राऊत यांच्या हस्ते या पुरस्कार विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिवजयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष अभिषेक इंगवले यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांचा सत्कार अभिषेक शिंदे यांनी केला. शिवजयंती उत्सव काळात घेतलेल्या पोवाडा, भाषण आणि वेशभूषा अशा विविध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ या वेळी झाला. शिवजयंती उत्सव उत्कृष्‍ट आयोजनाबद्दल समिती सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचाही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महेश जाधव, लाला गायकवाड, ऋतुराज सरनोबत, सागर चव्हाण, प्रसाद इंगवले, प्रकाश पाटील, सारंग पाटील, तेजस मोरे, अनिकेत सरनाईक, सुनील रामचंद्र राऊत, रवींद्र साळोखे, मोहन साळोखे, भरत जाधव, अनिकेत मोरे, शरद नागवेकर, अजिंक्य दळवी, रोहन यादव, ओंकार गवळी, नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com