संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त बातम्या
संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

नूतन मराठी विद्यालयात
वार्षिक पारितोषिक वितरण
कोल्हापूर : नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी व चित्रपट निर्माता संग्राम नाईक यांच्या हस्ते वर्षभरातील विविध स्पर्धेतील गुणवंताना गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष उदय सांगवडेकर होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. ए. शिंदे यांनी केले. जिमखाना प्रमुख आर. एन. कुंभार यांनी अहवाल वाचन केले. सुत्रसंचालन पी. पी. कुलकर्णी यांनी केले.
---------
‘हर्षवर्धन’ संस्थेच्या शाखेचे उदघाटन
कोल्हापूर : उद्यमनगर हुतात्मा पार्कमध्ये हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्थेच्या नव्या शाखेचे उद्‍घाटन माजी नगरसेवक नियाज खान यांच्या हस्ते झाले. या वेळी बहूजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव नाईक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी झाली. या वेळी अध्यक्ष रणजीत औंधकर, राहूल सोनटक्के, प्रशांत अवघडे, गणेश जाधव, लहु यादव, अभिजीत चव्हाण, अमर चव्हाण, महादेव कोरे उपस्थित होते.
--------
84401
सत्यजीत खाडे
84402
आब्बास गवंडी
जिल्हा बेकर्स संस्थेचे
सत्यजीत खाडे अध्यक्ष
कोल्हापूर, ता. २१ : कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली. त्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा सहकारी निवडणुक अधिकारी ए. सी. गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अध्यक्षपदी सत्यजीत खाडे, तर उपाध्यक्षपदी आब्बास गवंडी यांची निवड झाली. संचालकपदी अशोक तिलंगजी, संतोष बांदेकर, सागर खाडे, उत्तम माळी, सलीम कोटलगी, नजीर पिंजारी, लक्ष्मण पाटील, पंडीत माने, मुनीर मिर्झाई, जयराम विदवानी, यशवंत हजारे, सरला मोरे, वर्षा बोडके यांची निवड झाली. या वेळी सभासद रामचंद्र बोडके, विनायक क्षीरसागर, दिलावर शेख, सुशांत खाडे, शिवाजी कातवरे आदी उपस्थित होते.