
आजरा ः आजरा महाविद्यालय स्पर्धा
आजऱ्यात महिलांकरिता निबंध व वक्तृत्व स्पर्धा
आजरा ः आजरा महाविद्यालय आजरा अंतर्गत तक्रार निवारण समितीच्यावतीने आजऱ्यात महिलांकरीता निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. आजरा तालुक्यातील सर्व महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त स्पर्धा होत आहेत. कशी हवी सासू ? , माझा जोडीदार हे निबंध स्पर्धसाठी दोन विषय़ आहेत. शब्दमर्यादा १५०० इतकी आहे. निबंध पाठवतांना शेवटच्या पानावर स्पर्धकाचे नाव, पोस्टाचा पता व मोबाईल नंबर नोंद करावा. आजरा काॅलेजमध्ये सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत निंबध पोहच करावा. निबंध पाठवण्याची १ मार्च ही शेवटची तारीख आहे. गृहिणी म्हणून माझा पगार किती ? लव्ह जिहाद की लव्ह आझाद ? असे वक्तृत्व स्पर्धेचे विषय आहेत. कमीत कमी पाच ते जास्ती जास्त ७ मिनिटे स्पर्धेचा वेळ असेल. शनिवारी (ता. ४) स्पर्धा होईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. दोनही स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील.