राजू शेट्टीचे चक्का जाम

राजू शेट्टीचे चक्का जाम

‘स्वाभिमानी’चे आज चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर, ता. २१ : ऊस तोडणी मुकादमांकडून ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक, शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपाची तोडली जाणारी वीज याशिवाय, प्रोत्साहनात्मक अनुदान तत्काळ द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. यासाठी, कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, तालुक्याची मुख्य ठिकाणे व गावागावांत त्याचे नियोजन केले आहे. सरकार याकडे कानाडोळा करत असताना विरोधी पक्षनेतेही याकडे लक्ष देत नसल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज केली.
शेट्टी म्हणाले, ‘शेतकऱ्यांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय वीज पंपांची कनेक्शन तोडली जात आहेत. उन्हाळा वाढत असताना, शेतीला पाणीपुरवठा करावा लागत आहे. यातच शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचे काम केले जात आहे. ऊस तोडणी मुकादमांकडून ऊस वाहतूकदारांची मोठी फसवणूक होत आहे. पैसे घेऊन तोडणी मजूर कामावर येत नाही, यामुळे अनेक मुकादम अडचणीत आले आहेत. याशिवाय, राज्य शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या प्रोत्साहनात्मक अनुदानाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. हजारो शेतकरी अजूनही यापासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठीच हा उद्या राज्यव्यापी चक्का जाम केला जाणार आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला असून, इतर काही संघटनाही यामध्ये उतरणार आहेत. सकाळी नऊपासून चक्काजाम केला जाईल. यामध्ये तावडे हॉटेल, किणी टोल नाका, कोगनोळी टोल नाक्यासह राज्यातील प्रमुख मार्गांवर आंदोलन केले जाईल.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com