इचल : मराठा मंडळ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : मराठा मंडळ पुरस्कार
इचल : मराठा मंडळ पुरस्कार

इचल : मराठा मंडळ पुरस्कार

sakal_logo
By

84380
इचलकरंजी ः मराठा मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त देण्यात येणारे गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

गुणवंत शिक्षक
गौरव पुरस्कार वितरण
इचलकरंजी, ता. 21 ः येथील मराठा मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त देण्यात येणारे गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार वितरण सोहळा झाला. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डाॅ.डी.ए. देसाई यांच्याहस्ते पुरस्कार वितरण झाले. माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. यावेळी जीवन गौरव पुरस्काराने डॉ. दीपक चव्हाण (नाईट काॅलेज) यांना गौरविले. सयाजीराव पाटील (श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), श्रीरंग मोरे (हिराराम गर्ल्स हायस्कूल) श्रीमती संगीता पाटील (सरस्वती हायस्कूल), आनंदा शिऊडकर (शंकरराव जाधव विद्यामंदिर), अलका खोचरे-शेलार (रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन), अदिप पाटील (लालबहादूर शास्त्री विद्यामंदिर), रंजना घोरपडे (बालाजी बालमंदिर) व श्रीकांत कदम (विनायक हायस्कूल) यांना गौरव पुरस्कारांने सन्मानित केले. डाॅ.देसाई यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आनंदराव उदाळे यांनी केले.