
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
chd218.jpg
84403
हलकर्णी : राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.
----------------------------------
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २१ : महाविद्यालयीन प्रशासकीय कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी सोमवार (ता. २०) पासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कर्मचारीही सहभागी झाले आहेत.
सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करून पूर्ववत करावे, सातव्या वेतन आयोगामधील तरतुदीनुसार १०, २० व ३० वर्षानंतर लाभाची योजना लागू करावी, रिक्त पदे त्वरित भरावी, २००५ नंतर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार बोकडे यांनी सांगितले. संस्थेचे जेष्ठ संचालक गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. उपाध्यक्ष सुधीर गिरी सचिव श्रीपतराव कांबळे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले आहेत.