बारावी परीक्षा फेब्रुवारी 2023 : उत्तर पत्रिका मूल्यमापन बहिष्कार आंदोलनाची यशस्वी सुरूवात...

बारावी परीक्षा फेब्रुवारी 2023 : उत्तर पत्रिका मूल्यमापन बहिष्कार आंदोलनाची यशस्वी सुरूवात...

पुणे 21: महाराष्ट्र राज्य माध्य.व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी आज पुणे येथे राज्यातील इंग्रजी विषयाच्या मुख्य नियामकांची संयूक्त सभा बोलावली होती . महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने उत्तर पत्रिका मूल्यमापन बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे संयुक्त सभेसाठी पुणे येथे आलेल्या राज्यातील नऊ विभागीय मंडळातील (पुणे,नाशीक, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर)इंग्रजी विषयाच्या मुख्य नियामकांनी, महासंघाच्या आदेशानुसार , आम्ही उत्तर पत्रिका मूल्यमापन बहिष्कार आंदोलनात सहभागी आहोत असे लेखी निवेदन राज्य शिक्षण मंडळास दिले. त्यामुळे पुणे येथील संयुक्त सभा झाली नाही यावेळी महासंघाचे सरचिटणीस प्रा.सतोष फाजगे,प्रा.सुनिल पूर्णपात्रे, उपाध्यक्ष,प्रा.अविनाश तळेकर, कार्याध्यक्ष,व इंग्रजी विषय मुख्य नियामकप्रा.,एन.बी .बुराण कोल्हापूर,प्रा ए.एस दुर्गी ,प्रा.पोर्लैकर प्रा.खाडे, शांतीलाल प्राअतुल पाटील उपस्थित होते. राज्य मंडळाच्या सचिव श्रीमती अनुराधा ओक यांना निवेदन देण्यात आले

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा
उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार
---
महासंघाचे आंदोलन; राज्य शिक्षण मंडळाला निवेदन
कोल्हापूर, ता. २१ ः विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावी उत्तरपत्रिका मूल्यमापनावर (तपासणी) बहिष्कार आंदोलन आजपासून सुरू केले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली त्यांनी आंदोलन सुरू केले.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुणे येथे आज राज्यातील इंग्रजी विषयाच्या मुख्य नियामकांची संयुक्त सभा आयोजित केली होती. त्यासाठी राज्यातील पुणे, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर या विभागीय मंडळातील इंग्रजी विषयाचे मुख्य नियामक आले. मात्र, त्यांनी महासंघाच्या आदेशानुसार आम्ही उत्तरपत्रिका मूल्यमापन बहिष्कार आंदोलनात सहभागी आहोत, असे लेखी निवेदन राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांना दिले. त्यामुळे पुणे येथील संयुक्त सभा झाली नसल्याची माहिती या महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर यांनी दिली. या वेळी महासंघाचे सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे, सुनील पूर्णपात्रे, कार्याध्यक्ष आणि इंग्रजी विषय मुख्य नियामक प्रा. एन. बी. बुराण, ए. एस. दुर्गी, अतुल पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com