आजरा ः पेऱणोली आग नुकसान

आजरा ः पेऱणोली आग नुकसान

84448
पेरणोली ः येथे लागलेल्या आगीत जळालेले शेळ्यांचे शेड.
----------

पेरणोली येथील आगीत सव्वा लाखांचे नुकसान
आजरा ः पेरणोली (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत गवत गंज्या व दोन खोपी खाक झाल्या. सुमारे १५ एकरचा परिसर जळून गेला. आठ शेतकऱ्यांचे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामा केला असून, आगीचे नेमके कारण समजलेले नाही. मंगळवारी (ता. २१) दुपारी साडेतीनला ऊन व वाळलेला पालापाचोळा यामुळे आग पसरत केली. यामुळे बाबू लोखंडे, गणपती लोखंडे, शेवंता लोखंडे, आनंदा लोखंडे, हरीबा कांबळे यांच्या गवत गंज्या जळून गेल्या. बाबू लोखंडे यांचे शेळीचे शेड व अनिल कांबळे यांची खोप आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. प्रभाकर देसाई व शेवंता कांबळे यांच्या मेसकाठ्या जळून गेल्या. सुमारे १५ एकरच्या परिसराला आगीचा फटका बसला. आगीचे लोळ दिसू लागल्यावर ग्रामस्थ घटनास्थळी धावले. प्रभाकर देसाई यांच्या घरातून पाणी घेऊन आग विझविण्यात आली. ग्रामस्थांना आग आटोक्यात आणायला सुमारे तासभर अथक प्रयत्न करावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com