
ऋतूराज पाटील- सुमंगलम भेट
84471
कणेरी ः कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी ए. के. पाटील आणि आमदार ऋतूराज पाटील यांनी येथील सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाला भेट दिली.
सुमंगलम लोकोत्सवातून
आरोग्याचा जागर
ऋतूराज पाटील; ए. के. पाटील यांच्यासमवेत भेट
कोल्हापूर, ता. २१ ः अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ जनतेला समृद्ध जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आमदार ऋतूराज पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह त्यांनी कणेरी मठावर भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
लोकोत्सवामुळे पंचमहाभूतांचे महत्त्व लोकांना समजणार आहे. कोल्हापूरचे नाव जगभरात पोचणार असून सेंद्रिय शेतीबाबत प्रबोधन होऊन शेतकरी त्याकडे मोठ्या प्रमाणावर वळतील, असेही आमदार श्री. पाटील म्हणाले. एच. के. पाटील यांनी लोकोत्सवाच्या नियोजनाचे कौतुक केले. आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह त्यांच्या सर्वच परिवाराचे मठाला नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले.
वृक्षाचे आत्मकथन, सुंदर गावाची निर्मिती, मातीची जैवविविधता, कमी क्षेत्रातील बैल मशागत, ग्रामीण जीवनातील विविध कार्य, पडीक क्षारपड जमीन सुधार, कारखान्यांसाठी ऊस वाहतूक, स्वालंबी समृद्ध स्वाभिमानी गाव आदी संकल्पनाविषयीची माहितीही त्यांनी दिली.