
संक्षिप्त-पुरस्कार
89691
जयेश ओसवाल
जयेश ओसवाल यांना
एपीजे कलाम भारत पुरस्कार
कोल्हापूर : येथील अरिहंत जैन फाउंडेशनचे अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक जयेश ओसवाल यांना मुंबईतील ‘आयएमएलएफ’ या संस्थेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या आजवरच्या विविध सामाजिक कार्याची दखल घेवून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम भारत सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने त्यांचा गौरव होणार आहे. कार्यक्रमात उद्योग, व्यापारासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा गौरव होणार असून रविवारी (ता. २६) अंधेरीतील ग्रॅंड इम्पेरिअल येथे हा कार्यक्रम होईल. आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता, कृष्णप्रकाश, उषा बाजपाई, मेजर जनरल विक्रम देव-डोगरा, जहीर दरबार यांचाही या कार्यक्रमात गौरव होणार आहे. ओसवाल यांनी अरिहंत जैन फाउंडेशन, जायंट्स इंटरनॅशनल, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, जैन सोशल ग्रुप आदी संस्था व संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमात नेहमीच सक्रीय पुढाकार घेतला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे कोल्हापूर भूषण, जायंट्स इंटरनेशनलतर्फे बेस्ट प्रेसीडेंट ऑफ द वर्ल्ड आदी पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे.