‘प्रादेशिक’च्या फेरसुनावणीचा
अहवाल तातडीने मंजूर करा

‘प्रादेशिक’च्या फेरसुनावणीचा अहवाल तातडीने मंजूर करा

‘प्रादेशिक’च्या फेरसुनावणीचा
अहवाल तातडीने मंजूर करा
इंजिनिअसर्स असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर, ता. २१ : कोल्हापूर प्रादेशिक योजनेच्या फेरसुनावणी संदर्भातील अहवाल तातडीने मंजूर करावा, अशी मागणी असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स ॲड इंजिनिअर्सनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच वर्ग दोन प्रकारातील जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतर करण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा, अशीही मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, प्रादेशिक योजनेच्या मंजुरीनंतर त्यातील त्रुटीबाबत प्रचंड तक्रारी आल्‍या. त्यासाठी शासनाने त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली होती. या समितीने त्रुटींबाबत फेरसुनावणी घेऊन अहवाल अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे. २०१८-२०१९ मध्ये मंजुरी अपेक्षित असलेल्या योजनेचा फेरसुनावणी अहवाल आजअखेर मंजूर झालेला नाही. त्याचा परिणाम जिल्ह्यांतील विकासकामांवर व पर्यायाने शासनाच्या महसुली उत्पन्नावर होत आहे. सर्वसामान्य जनतेची कुचंबना होत आहे. त्यामुळे अहवाल तातडीने मंजूर करण्याची गरज आहे. वर्ग दोन प्रकारातील जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याबाबतच्या अधिसूचनेला २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली होती. तसेच त्यावर सूचना, हरकती मागवल्या होत्या. ऑगस्ट २०२२ मध्ये त्याची मुदत संपली आहे. आजअखेर अंतिम शासन निर्णय, अधिसूचना प्रसिद्ध केलेली नाही. याबाबतही तातडीने कार्यवाही करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com