
रेल्वे वेळेत तत्पूरता बदल
चार रेल्वे गाड्यांचा
२८ फेब्रुवारीचा प्रवास रद्द
कोल्हापूर, ता. २३ ः सातारा ते कोरेगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या तांत्रिक अडचणीमुळे २८ फेब्रुवारीला कोल्हापूर ते सातारा मार्गावरील काही रेल्वे एक दिवसासाठी रद्द केल्या आहेत, तर काही रेल्वेच्या वेळांमध्ये बदल केले आहेत, अशी माहिती रेल्वेच्या प्रबंधकांकडून देण्यात आली.
एक दिवसासाठी रद्द झालेल्या गाड्या अशा ः कोल्हापूर -पुणे - कोल्हापूर, कोल्हापूर - मुंबई - कोल्हापूर आणि कोल्हापूर -सातारा - कोल्हापूर (पॅसेंजर).
तर मार्गात बदल झालेल्या रेल्वे अशाः महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदिया ते कोल्हापूर , (२८ फेब्रुवारी) कोल्हापूर ते पुणेपर्यंत धावणारी रेल्वे रद्द झाली आहे.
निजामुद्दीन कोल्हापूर ते दिल्ली एक्स्प्रेसचे २७ फेब्रुवारीचे पुणे, सातारा, कराड, नांद्रे हे थांबे रद्द झाले आहेत. याच कोल्हापुरातून दिल्ली जाणाऱ्या रेल्वेचे २८ फेब्रुवारीला सांगली, कराड, सातारा, पुणे हे थांबे रद्द झाले आहेत. महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूर ते मुंबई ही २७ फेब्रुवारीला सुटणारी रेल्वे ३५ मिनिटे उशिरा सुटणार आहे.