Sun, June 4, 2023

विद्यापीठातील आगीत २० एकरातील गवत खाक
विद्यापीठातील आगीत २० एकरातील गवत खाक
Published on : 21 February 2023, 4:52 am
84488
.........
विद्यापीठातील आगीत
२० एकरांतील गवत खाक
कोल्हापूर ः अज्ञाताने लावलेल्या आगीमध्ये शिवाजी विद्यापीठ परिसरातील २० एकरमधील गवत जळून खाक झाले. त्या परिसरातील काही झाडांना आगीची झळ बसली. विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभाग आणि रडार केंद्र परिसरातील मोकळ्या जागेतील गवताला अज्ञाताने आग लावली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी त्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला देऊन तातडीने आग लागलेल्या ठिकाणी धाव घेतली. महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेचे दोन बंबदेखील त्याठिकाणी दाखल झाले. सुरक्षारक्षक आणि अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. याबाबत प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी सांगितले की, या आगीमध्ये सुमारे २० एकरांतील गवत जळून खाक झाले आहे. काही झाडांनादेखील झळ बसली आहे.