स्वेटर विक्रेत्यांचे स्टॉल हटवले

स्वेटर विक्रेत्यांचे स्टॉल हटवले

फोटो फाईल - ich२२२.jpg
84514
इचलकरंजी ः राणी बाग परिसरातील स्वेटर विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले.

स्वेटर विक्रेत्यांचे स्टॉल हटवले
इचलकरंजी ः येथील राणी बागेसमोर असलेल्या स्वेटर विक्रीसाठी उभारलेले स्टॉल महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटवले. अनेक वर्षे वर्दळीच्या ठिकाणी स्टॉल उभारले होते. येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत होती. सायंकाळी उद्यान सुरू झाल्यानंतर तर येथून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. याबाबत नागरिकांची तक्रार महापालिकेकडे आली होती. त्याची दखल घेत संबंधित संपूर्ण अतिक्रमण हटवण्यात आले. त्यामुळे वाहतुकीसाठी परिसर खुला झाला. सुभाष आवळे यांच्या नेतृत्वाखालील कारवाई करण्यात आली.
------------

फोटो फाईल - ich२२३.jpg
84515
इचलकरंजी ः खासदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्‍घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत झाले.

खासदार चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
इचलकरंजी ः माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने योग जिम्नॅशियम मैदानावर आयोजित केलेल्या ‘खासदार चषक’ क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ झाला. खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. त्यांनी स्वतः जोरदार फलंदाजी करीत उत्तुंग षटकारही ठोकला. शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वखर्चातून रजपुते यांनी विकासकामे केली असून खऱ्या अर्थाने ते लोकसेवक आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. रजपुते यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, प्रकाश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, भाऊसो आवळे, रवी लोहार, उदय धातुंडे, अशोक कांबळे, नरेश नगरकर, बाबू पनोरी, नागेश पाटील, शिवाजी जगताप, अण्णा कागले, रोहित रजपुते, अमर रजपुते, अमोल कविशील, अमित जावळे, स्पर्धा संयोजक अर्जुन भिसे उपस्थित होते.
-------------------
जंगमवाडी-यळगूड रस्त्यासाठी निधी
इचलकरंजी ः मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ८.८६ कोटी रुपये खर्चाच्या राज्यमार्ग १७७ जंगमवाडी ते राज्यमार्ग १९५ यळगूड रस्त्याच्या कामाला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली आहे. यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी पाठपुरावा केला होता. जंगमवाडी ते यळगूड हे दोन्ही राज्यमार्ग दैनंदिन दळणवळणाचे प्रमुख मार्ग असून नजीकच्या कर्नाटक राज्याला जोडणारे महत्त्वाचे मार्ग आहेत. या राज्यमार्गांची दुरवस्था झाली होती.
-----------------

तारदाळचा कायापालट करणार ः आमदार आवाडे
इचलकरंजी ः इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील तारदाळ गावचा विकासकामांच्या माध्यमातून कायापालट केला जाणार आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. ज्ञानेश्‍वरनगरात पाण्याच्या टाकीलगत असलेल्या खुल्या जागेत नाना-नानी पार्क होणार आहे. अत्याधुनिक व्यायामशाळा आणि कुस्ती आखाड्याशिवाय सार्वजनिक वाचनालयाची इमारत उभारली जाणार आहे. ज्ञानेश्‍वरनगर ते माळभाग ते तारदाळ चौक परिसरात रस्ते आणि गटाराची कामेही मार्गी लागतील. त्यामुळे माळभागातील नागरिकांना भेडसावणारा सांडपाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी निकालात निघणार आहे. यासाठी कोट्यवधींचा निधी अपेक्षित असून प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले.
-----------------
मोठे तळे रस्ता रुंदीकरणाबाबत सकारात्मक निर्णय
इचलकरंजी ः मोठे तळे ते लोकमान्य टिळक पुतळा रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत महापालिकेतील बैठकीत सकारात्मक निर्णय झाला. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस बाधीत मिळकतधारक व नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याप्रश्नी सुभाष मालपाणी यांनी पाठपुरावा केला. रस्ता रुंदीकरणासाठी जागा संपादित होणार आहे. रस्त्याच्या मध्यापासून समसमान पद्धतीने दोन्ही बाजूला रुंदीकरण केले जाणार आहे. यामुळे बाधीत जागा टीडीआर पद्धतीने संपादित होणार आहे. त्यादृष्टीने चर्चेसाठी बैठक झाली. हा मार्ग अरुंद असून वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे रूंदीकरणाचा निर्णय तत्कालीन राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत २०१८ मध्ये झाला होता. तसे आदेशही तत्कालीन पालिका प्रशासनाला प्राप्त झाले होते; पण कार्यवाही झाली नाही. याबाबत मालपाणी यांनी आयुक्त देशमुख यांना निवेदन देऊन गतीने कार्यवाहीची मागणी केली होती. त्यावर बैठक झाली असून सकारात्मक निर्णय झाल्याने रूंदीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. बैठकीस बाधीत मिळकतधारकांसह नगररचना विभागाचे रणजित कोरे, मिळकत व्यवस्थापक सचिन पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com