इचलकरंजी केंद्राध्यक्षपदी सपना आवाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी केंद्राध्यक्षपदी सपना आवाडे
इचलकरंजी केंद्राध्यक्षपदी सपना आवाडे

इचलकरंजी केंद्राध्यक्षपदी सपना आवाडे

sakal_logo
By

84564

इचलकरंजी केंद्राध्यक्षपदी सपना आवाडे
महाराष्ट्र बालशिक्षण परिषद कार्यकारिणी निवड; उपाध्यक्षपदी मदन कारंडे

इचलकरंजी, ता. २२ ः महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या इचलकरंजी केंद्राच्या अध्यक्षपदी डॉ. सौ. सपना आवाडे, तर उपाध्यक्षपदी मदन कारंडे यांची निवड केली. डीकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकच्या सभागृहात विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यामध्ये परिषदेच्या इचलकरंजी केंद्राची नूतन कार्यकारिणी निवडली. अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष डी. एम. कस्तुरे होते.
अन्य कार्यकारिणी अशी ः कार्याध्यक्ष - डी. बी. टारे, सचिव- प्रीती कट्टी, खजिनदार - संतोष पाटील, सहसचिव - अशोक केसरकर, संचालक - शामराव नकाते, सुधाकर मणेरे, जयकुमार कोले, डॉ. जयकांता बडबडे, श्रीकांत चंगेडीया, कौशिक मराठे, निर्मला ऐतवडे, कविता नेर्लेकर, हमिदा गोरवाडे, डॉ. मनीषा शेट्टी, मीनाक्षी तंगडी.
दरम्यान, विविध माध्यमांतून शास्त्रीय बालशिक्षणाचा कार्यक्षमपणे समाजात प्रसार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कार्यकारिणीने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची तत्परतेने अंमलबजावणी व्हावी, या हेतूने शिक्षक, मुख्याध्यापकांची कृती समिती स्थापन केली. वैशाली काडे यांची समन्वयक म्हणून निवड केली. समितीमध्ये रेखा भोसले, सुनीता केटकाळे, सुरेखा कुंभार, रेखा पाटील, सुगंधा चौगुले, शैला कांबरे, संध्या सोनवणे, उज्ज्वला पाटील, स्मिता रणदिवे यांचा समावेश केला. निवडीनंतर केंद्र कार्यकारिणी व कृती समितीतील सदस्यांचा कस्तुरे यांच्याहस्ते सत्कार केला.