तनिष्का साखर कारखाना भेट

तनिष्का साखर कारखाना भेट

लोगो - तनिष्का
84568
कोल्हापूर : ‘सकाळ’ तनिष्का व्यासपीठातर्फे कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला अभ्यास भेट दिली. या वेळी उपस्थित तनिष्का सदस्या.


‘तनिष्कां’नी घेतली साखर निर्मिती प्रक्रियेची माहिती
अभ्यास दौरा; छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला दिली भेट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या सदस्यांनी कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला भेट देऊन साखर निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली.
रोजच्या आहारात साखरेचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये उपयोग होत असतो याचा निर्मिती उद्योग कसा असतो, याची माहिती व्हावी या उद्देशाने तनिष्का व्यासपीठातर्फे शहरातील तनिष्का सदस्यांकरिता गटप्रमुख राजश्री सावर्डेकर, मंगला काळे व वैशाली भोसले यांच्या पुढाकाराने साखर कारखाना भेटीचे नियोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यात तनिष्का महिला सदस्यांनी साखर कारखाना चालवण्यासाठी लागणारी भव्य जागा, याशिवाय मोठमोठ्या मशिनरी पाहून साखर निर्मितीची प्रक्रिया जाणून घेताना गाळप प्रोसेस पासून वाफ तयार करणे, रस गरम करण्याची प्रक्रिया, साखर निर्मिती, पॅन प्रोसेस तसेच साखर व रस वेगळा करण्याची प्रक्रिया व प्रत्यक्ष साखर निर्मिती होऊन गोडाऊन पर्यंतचा सर्व प्रवास सहायक अभियंता एम. एल. पाटील यांनी तनिष्का सदस्यांना प्रत्यक्षरित्या दाखविला. दरम्यान, तनिष्का सदस्यांनी तळपत्या उन्हात कारखान्याने दिलेल्या उसाच्या रसाचा आस्वाद घेतला.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापक संचालक प्रकाश चिटणीस व सचिव उदय मोरे यांनी तनिष्का सदस्यांना कारखाना भेटीची संधी निर्माण करून दिली. या वेळी तनिष्का व्यासपीठाचे समन्वयक राजेंद्र जाधव व शहरातील तनिष्का उपस्थित होत्या.
-------------
चौकट
वाफेपासून वीजनिर्मिती
कारखान्याला लागणारी वीज कारखान्यात सहवीजप्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण केली जाते. उसाचा रस उकळताना निर्माण झालेल्या वाफेचा वापर करून दोन टर्बाईनच्या माध्यमातून तीन मेगावॉट विजेची निर्मिती होते. याचीही माहिती तनिष्का सदस्यांनी अभ्यास दौऱ्यात घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com