‘चंदुकाका सराफ’ पेढीतर्फे ‘मन्थ ऑफ लव्ह’ उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘चंदुकाका सराफ’ पेढीतर्फे
‘मन्थ ऑफ लव्ह’ उपक्रम
‘चंदुकाका सराफ’ पेढीतर्फे ‘मन्थ ऑफ लव्ह’ उपक्रम

‘चंदुकाका सराफ’ पेढीतर्फे ‘मन्थ ऑफ लव्ह’ उपक्रम

sakal_logo
By

‘चंदूकाका सराफ’ पेढीतर्फे
‘मन्थ ऑफ लव्ह’ उपक्रम
कोल्हापूर, ता. २२ : नावीन्यता व आधुनिकतेचा मेळ साधत चंदूकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स प्रा. लि. ने अप्रतिम दागिन्यांचे वैविध्यपूर्ण कलेक्शन्स सादर केले आहेत. फेब्रुवारी महिना म्हणजे आपल्या जिवलगाबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा महिना. व्हॅलेंटाईन डे निमित्त चंदूकाका सराफने हा महिना ‘मन्थ ऑफ लव्ह’ म्हणून साजरा केला आहे.
आपल्या जोडीदाराविषयी वाटणाऱ्या प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी चमचमत्या व पैलूदार हिऱ्यासारखा दुसरा कुठलाच अलंकार नाही. रविवार (ता. २६) पर्यंत चंदूकाका सराफद्वारे हिऱ्यांचे एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स सादर केले जात आहेत. कलात्मक दागिन्यांच्या श्रेणीमध्ये आजच्या आधुनिक स्त्रीला साजेल अशा मनमोहक हिऱ्यांच्या दागिन्यांचे असंख्‍य प्रकार उपलब्ध केले आहेत. रोजच्या वापरासाठी हे हिऱ्यांचे दागिने असतील, हे या श्रेणीचे खास आकर्षण आहे. यामध्ये लाईट व हेवी अशा दोन्ही वजनांचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. खास ‘मन्थ ऑफ लव्ह’साठी हिऱ्यांच्या अलंकारांच्या घडणावळीवर शंभर टक्केपर्यंत सूट दिलेली आहे. तसेच सोन्‍याच्‍या दागिन्‍यांच्‍या घडणावळीवर १५ टक्के सूट देण्‍यात आली आहे.