
आजरा ः तहसीलदार कार्यालय बातमी
84604
तहसीलदार अहिर यांचा
होप फौंडेशनतर्फे गौरव
आजरा ः तहसीलदार विकास अहिर यांचा होप फौंडेशन गडहिंग्लजमार्फत गौरव झाला. आजरा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ देवून तहसीलदार अहिर सत्कार झाला. यावेळी नगरसेवक आनंदा कुंभार उपस्थित होते. विहान संस्थेचे प्रतिनिधी अमोल कांबळे यांनी स्वागत केले. फाैंडेशनचे प्रमुख नचिकेत भद्रापुरे प्रास्ताविकात म्हणाले, ‘होप फौंडेशनने एचआयव्ही बाधीत १३० मुलांना संस्थेने दत्तक घेतले. यात तहसीलदार अहिर व सहकाऱ्यांनी मदत केली. कोरोना काळातही तहसील अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहिले.’ यावेळी नायब तहसीलदार डी. डी. कोळी, पुरवठा अधिकारी मनोज दाभाडे, महसुल सहाय्यक सुजाता कांर्जिणेकर, संजय गांधी योजनेचे प्रकाश कांबळे, संदेश बारपत्रे, दिलीप जाधव, नीलेश कांबळे, पिंटू दोरुगडे, रवींद्र दावणे, शीतल ओतारी यांचाही सत्कार झाला. माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय मोहीते व महसूल कर्मचारी उपस्थित होते.