मराठी अध्यापक संघाचे पुरस्कार जाहीर

मराठी अध्यापक संघाचे पुरस्कार जाहीर

मराठी अध्यापक संघाचे पुरस्कार जाहीर
कोल्हापूर, ता. २२ ः कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली. या वेळी सचिन यादव, अरुण कुंभार, सदाशिव हाटवळ, पी. डी. पाटील आदी उपस्थित होते.
रविवारी (ता. २६) राजर्षी शाहू स्मारक भवनात पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांची प्रमुख उपस्थिती असेल. राजेंद्र पाटील (आदर्श प्रशाला), दिलीप पाटील (महाराष्ट्र हायस्कूल), निशा साळोखे (राजर्षी शाहू हायस्कूल), मंगल रुकडीकर (नागोजीराव पाटणकर हायस्कूल), शामराव पाटील (भाई माधवरावजी बागल हायस्कूल), रघुनाथ कांबळे (नेर्ली विद्यालय), बबन कानकेकर (भाऊराव पाटील हायस्कूल, आवळी खुर्द), बाबासाहेब माने (छत्रपती शिवाजी हायस्कूल, तिरवडे), शोभा कुंभार (व्यंकटराव हायस्कूल, आजरा), वैजनाथ सुतार (रामलिंग हायस्कूल, तुडये), प्रज्ञा देसाई (नरदे हायस्कूल, नांदणी), सीमा कागवाडे (दानलिंग विद्यालय, उमळवाड), बाळासो मोटे (जाधव इंग्लिश स्कूल, पट्टणकोडोली), महालिंग मिठारी (भारती हायस्कूल, शहापूर), बाबासाहेब चौगले (पवार हायस्कूल, परखंदळे), अरविंद चव्हाण (यशवंत विद्यालय, असंडोली), संभाजी चव्हाण (महालक्ष्मी हायस्कूल, सावर्डे बुद्रुक), निळकंठ कुराडे (न्यू इंग्लिश स्कूल, नूल), राजेंद्र नाईकवाडी (उत्कृष्ट ग्रंथपाल) यांना पुरस्काराने गौरविण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com