केडीसी सोमय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडीसी सोमय्या
केडीसी सोमय्या

केडीसी सोमय्या

sakal_logo
By

जिल्हा बँकेत सोमय्या यांचे स्वागतच

आमदार हसन मुश्रीफ ः कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, ता. २२ ः भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात उद्या (ता. २३) भेट देणार असल्याचे समजले. श्री. सोमय्या यांचे जिल्हा बँकेत स्वागतच आहे, असे पत्रक बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिले आहे. सोमय्या यांच्या बँकेच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर आमदार मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
‘तुम्ही बँकेत या आणि हवी ती माहिती घ्या,’ असे आवाहन यापूर्वीच मी श्री. सोमय्या यांना केले आहे. कदाचित त्यानुसार ते येत असावेत. दरम्यान, प्रशासकाची कारकीर्द संपल्यानंतर बँकेने गेल्या आठ वर्षात नेत्रदीपक अशी प्रगती केलेली आहे. विविध पक्षांचे प्रतिनिधी असलेले आम्ही संचालक मंडळ एकमताने आणि अतिशय विश्वासाने काम करीत आहोत. त्यामुळेच बँकेची यशस्वी वाटचाल होत आहे. या घडीला बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के आहे. गेल्या ३१ डिसेंबर २०२२ अखेर बँकेला १०५ कोटी नफा झाल्याचे श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
...........

सोमय्या यांचा दौरा असा

सकाळी महालक्ष्मी एक्स्‍प्रेसने आगमन. दहा वाजता विभागीय सहनिबंधकांची भेट, पावणे अकरा वाजता जिल्हा बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा, ११.३० वाजता सर्किट हाऊसवर शेतकऱ्यांशी संवाद, सव्वा बारा वाजता पत्रकार परिषद.