यिन जिल्हाध्यक्ष निवडणुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन जिल्हाध्यक्ष निवडणुक
यिन जिल्हाध्यक्ष निवडणुक

यिन जिल्हाध्यक्ष निवडणुक

sakal_logo
By

लोगो - यिन

84630
ज्ञानेश्‍वर शिंदे, जिल्हाध्यक्ष, यिन.
84631
राजलक्ष्मी कदम, कार्याध्यक्ष, यिन.

‘यिन’ जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर, कार्याध्यक्षपदी राजलक्ष्मी
नेतृत्व विकास कार्यक्रम; शॅडो कॅबिनेटमध्ये मिळणार दोघांना संधी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : महाविद्यालयीन तरुणांच्या नेतृत्व क्षमतेला वाव देऊन तरुणांमधून नवे नेतृत्व घडविण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) द्वारे लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम राबविण्यात येतो. जिल्ह्यातील महाविद्यालयांत मतदानाद्वारे ‘यिन’ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. यामधून राज्यस्तरावर जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात यिनच्या जिल्हाध्यक्षपदी गडहिंग्लजच्या कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या ज्ञानेश्‍वर शिंदे याची निवड झाली, तर जिल्हा कार्याध्यक्षपदी कमला कॉलेजची विद्यार्थिनी राजलक्ष्मी कदम हिची निवड झाली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राज्यस्तरावर यिन शॅडो कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.
------
अशी झाली निवड प्रक्रिया
‘सकाळ’ शहर कार्यालयात अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणूक प्रक्रियेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या यिन अध्यक्ष - उपाध्यक्षांनी सहभाग नोंदवत जिल्हाध्यक्षपदासाठी आपली दावेदारी ठेवली होती. ६० गुणांची लेखी परीक्षा व ४० गुणांची व्यक्तिमत्त्व विकास कौशल्य चाचणी मुलाखतीद्वारे घेण्यात आली. लेखी परीक्षा, वक्तृत्व कौशल्य, अनुभव व केलेल्या कामाच्या आधारे उमेदवारांचे गुणांकन करून टॉप फाईव्ह उमेदवार निश्चित करण्यात आले. यातून अंतिम दोन उमेदवार निवडून त्यांना ‘यिन’च्या महाविद्यालय अध्यक्ष - उपाध्यक्षांनी केलेल्या मतदानाद्वारे अंतिम निवडी जाहीर करण्यात आल्या. ‘यिन’चे सहाय्यक व्यवस्थापक अवधूत गायकवाड, मोहन मोरे, तानिया मुरसल, सई साळोखे, स्नेहल परीट, तिर्था मोळे व शिवानी नागराळे यांनी संयोजन केले.

‘यिन’चे जिल्हास्तरीय नूतन पदाधिकारी
जिल्हाध्यक्ष : ज्ञानेश्वर शिंदे, कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय, गडहिंग्लज
कार्याध्यक्ष : राजलक्ष्मी कदम, कमला कॉलेज.
उपाध्यक्ष : प्रिया पाटील, विवेकानंद कॉलेज (८४६३४).
सरचिटणीस : साईनाथ मोहिते, डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालय, जयसिंगपूर (८४६३९).
प्रवक्ता : मयुर खोत, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे (८४६४०).
महापौर : समृद्धी टिपुगडे, सायबर महिला महाविद्यालय (८४६४१).
जिल्हा परिषद अध्यक्ष : प्रतिक्षा घुले, कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय, गडहिंग्लज (८४६४२).
सभापती : शिवानंद पोळ, सायबर कॉलेज (८४६४३).
उपसभापती : रिषभ बोरकर, संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालय, महागाव (८४६४५).
गटनेता : ओंकार चव्हाण, महावीर कॉलेज (८४६४७).
---------
कोट
परीक्षकांच्या मते...
८४६५१
निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांची क्षमता, कौशल्ये आणि ज्ञान मोजणारी होती. विद्यार्थीही अभ्यास करूनच निवडणूक प्रक्रियेत उतरले होते. त्यांनी सामाजिक भान ठेवले तर नक्कीच त्यांचा विकास होईल.
- डॉ. बी. एम. हिर्डेकर, माजी परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ.

८४६५४
सकाळ माध्यम समूहाने ‘यिन’च्या माध्यमातून दिलेले व्यासपीठ नेतृत्वगुणांचा विकास करते. या माध्यमातून तरुणाई आपल्या क्षमता ओळखू शकते. वक्तृत्व कौशल्य व सामान्यज्ञान यांचा उपयोग त्यांना भविष्यात नक्कीच होईल.
- गीता हसूरकर, सामाजिक कार्यकर्त्या.

८४६५२
‘यिन’चा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचा आहे. यामध्ये तरुणाईची नेतृत्व क्षमता, समाजाबद्दलची आकलन क्षमता वाढते. त्यासोबतच त्यांच्या आयुष्याची ध्येये स्पष्ट होतात.
- डॉ. ताहीर झारी, प्रशिक्षक व राष्ट्रीय स्तरावरील संसाधन व्यक्ती.

८४६५३
‘यिन’ हे अराजकीय व्यासपीठ असून तरुणांनी ‘यिन’च्या माध्यमातून समस्यांचा अभ्यास करून सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. ‘यिन’द्वारे तरुणाईतील नेतृत्वगुण विकसित होऊन युवकांना नवनेतृत्व मिळेल.
- प्रा. संदीप गाडे.

८४६५५
‘यिन’चे व्यासपीठ विद्यार्थ्यांचे नेतृत्व क्षमता वाढवते. त्यामुळे समाजाला दिशा मिळते. समाजाच्या विकासासाठी यिनचे व्यासपीठ नक्कीच दिशादर्शक ठरणार आहे, यात शंका नाही.
- प्रा. तेजस्विनी चिले.

८४६५६
‘यिन’च्या निवड प्रक्रियेतील सर्वच उमेदवार तयारीने आले असल्याने निवड प्रक्रिया चुरशीने झाली. निवड प्रक्रिया उमेदवारांचा कस पाहणारी होती. त्यामुळे हा अनुभव त्यांना भविष्यात कामी येईल.
- विजयकुमार आवळेकर.