अपघातात दुचाकीस्वार ठार

अपघातात दुचाकीस्वार ठार

84670

गंगाराम पाटील
----
ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर दुर्घटना

चंदगड, ता. २२ ः बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार गंगाराम यलाप्पा पाटील (वय ३०, रा. नरेवाडी, ता. चंदगड) ठार झाले. आज सकाळी दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृत पाटील हे माडवळे (ता. चंदगड) येथून दुचाकीने (एमएच ०९ बीक्यू ९५३७) गावाकडे येत होते. मजरे कार्वेनजीक भरधाव ट्रॅक्टरने (एमएच ०९ एएल ८३४८) त्यांना जोराची धडक दिली. यात ते जागीच ठार झाले. दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. या प्रकरणी पाटील यांचे भाऊ जानबा यलाप्पा पाटील यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली. अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हेड कॉंस्टेबल जाधव अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com