दंड सवलत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दंड सवलत
दंड सवलत

दंड सवलत

sakal_logo
By

थकीत रक्कमेवरील दंडव्याज
सवलतअंतर्गत ९२ लाख जमा
कोल्हापूर, ता. २२ : घरफाळा थकीत रकमेवरील दंडव्याज सवलत योजनेंतर्गत घरफाळा विभागाकडे बुधवारी ९१ लाख ९९ हजार थकीत रक्कम जमा झाली. महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाने मिळकत थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये फेब्रुवारी व मार्चसाठी सवलत योजना सुरू केली आहे. यंदाच्या करासह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केल्यास दंडव्याजामध्ये २८ फेब्रुवारीअखेर ५० टक्के व १ ते ३१ मार्चअखेर ४० टक्के सवलत दिली जाणार आहे. या योजनेस प्रतिसाद देत आजअखेर २८६२ करदात्यांनी ५ कोटी थकीत रक्कम महानगरपालिकेकडे जमा केली आहे. १ एप्रिल २०२२ ते २२ फेब्रुवारी २०२३ अखेर ९०७४३ करदात्यांकडून ५६ कोटी ९० लाख ६६ हजार रक्कम जमा झाली आहे.
या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन थकीत रक्कम भरणा करावी. जप्ती, मिळकतींवर बोजा नोंद होण्यासारखे कटू प्रसंग टाळावेत, असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. कर भरणा करण्यासाठी शनिवारीही सर्व नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवली आहेत.