विद्यापीठातील प्राध्यापक शैलेश वाघमारे यांचा मृत्यू

विद्यापीठातील प्राध्यापक शैलेश वाघमारे यांचा मृत्यू

84698)
.................


प्रा. शैलेश वाघमारे यांचा बुडून मृत्यू

राजाराम तलावात आढळला मृतदेह : विद्यापीठात होते कार्यरत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः शिवाजी विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी विभागामधील सहायक प्राध्यापक डॉ. शैलेश रमाकांत वाघमारे (वय ३८, रा. केदारनगर, मोरेवाडी) यांचा राजाराम तलावात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार निदर्शनास आला. त्याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली.
पोलिसांनी सांगितले की, आटपाडी (जि. सांगली) येथील डॉ. वाघमारे गेल्या १२ वर्षांपासून विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी विभागात सहायक प्राध्यापकपदी कार्यरत होते. पत्नीची मणक्याची शस्त्रक्रिया असल्याने २३ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान रजेवर असल्याचे त्यांनी विभागाला कळविले होते. मंगळवारी रात्री पावणेआठ वाजेपर्यंत ते विभागात होते. त्यांनी आटपाडीला येणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. मात्र, रात्री साडेनऊ वाजले तरी ते घरी आले नसल्याने त्यांचे वडील, भाऊ यांनी मोबाईलवर संपर्क साधला. पण, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली.
दरम्यान, एका विद्यार्थ्याला राजाराम तलाव परिसरात त्यांची दुचाकी दिसून आली. त्यांनी याची माहिती विभागाला दिली. डॉ. वाघमारे यांचे कुटुंबीय आणि विभागातील प्राध्यापकांनी याबाबत राजारामपुरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तपास केला असता त्यांचा या तलाव परिसरात मृतदेह आढळला. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये त्यांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
...
चौकट

मनमिळावू, शांत स्वभाव

डॉ. वाघमारे यांनी शिवाजी विद्यापीठातून मायक्रोबायोलॉजी विषयातून पीएच.डी.ची पदवी घेतली होती. त्यानंतर ते याच विभागात सहायक प्राध्यापकपदी रुजू झाले. ते मनमिळावू आणि शांत स्वभावाचे होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com