सुमंलग लकोत्सवात  सेंद्रीय शेतीचे यशस्वी प्रयोग

सुमंलग लकोत्सवात सेंद्रीय शेतीचे यशस्वी प्रयोग

84478

सुमंगलम्‌ महोत्सवात सेंद्रिय शेतीचे यशस्वी प्रयोग
नैसर्गिक खते वापरून घेतली १२६ पिके, उत्पादनात वाढ

ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः सिद्धगिरी मठावर सुरू असलेल्या सुमंगलम्‌ महोत्सवात सेंद्रिय शेतीचे यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. येथे अडीच एकरात १२६ पिके सेंद्रिय पद्धतीने घेतली असून, यामध्ये बहुतांशी सर्व प्रकारांचा समावेश आहे. येथील कृषी विज्ञान केंद्राने हे यशस्वी प्रयोग करून दाखवले आहेत. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास उत्पादन वाढते हे या प्रयोगातून दाखवून दिले आहे.
पृथ्वी म्हणजे जमीन हे पंचतत्त्‍वातील एक तत्त्‍व आहे. माणसाच्या जीवनात जमिनीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, हीच जमीन विविध करणांनी बाधित होत आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या बेसुमार वापराने जमिनीचा पोत खराब होत आहे. काही ठिकाणी जमिनी नापीक झाल्या आहेत. त्यामुळे आता सेंद्रिय शेती करण्याची गरज आहे. मात्र, सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन कमी होते असा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आहे. तो दूर करण्यासाठी कणेरी येथील कृषी विज्ञान केंद्राने अडीच एकरामध्ये सेंद्रिय शेतीचे प्लॉट केले आहेत. यामध्ये त्यांनी १२६ पिके घेतली आहेत. यामध्ये तृणधान्य, भरड धान्ये, डाळ वर्गीय वनस्पती, तेलासाठी उपयोगात येणारी पिके, फुले आणि भाजीपाला, फळे, झुकेनिया, आईस बर्ग, ब्रोकोली, ट्युबर्स क्रॉच या विदेशी भाज्या घेतल्या आहेत. सोयाबीन, भुईमूग, गळीत धान्य, जवस, कराळे ही पिके घेतली आहेत. ताग, ध्येंच्या ही हिरवळीची पिकेही घेतली आहेत. या पिकांवर देशी गायीच्या गोमूत्राची फवारणी केली जाते. जीवांमृताचा वापर केला जातो. या शिवाय विविध प्रकारची नैसर्गिक खते दिली जातात. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि उत्पन्नही वाढते.

कोट
जीवनशैली ठीक तर सर्व काही ठीक असे सांगितले जाते. अन्न हा जीवनशैलीतील सर्वात महत्त्‍वाचा घटक आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीला पर्याय नाही. सुमंगलम्‌ लोकोत्सवात सेंद्रिय शेतीचे यशस्वी प्रयोग करून दाखवले आहेत. शेतकरी या प्लॉटना भेटी देऊन माहिती घेतात. त्यांना सेंद्रिय शेतीची प्रेरणा या लोकोत्सवातून मिळणार आहे.
- डॉ. रवींद्र सिंग, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कणेरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com